म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील गणोर येथे 14 एप्रिल तोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त संविधान भवनाच्या जागेचे उदघाटन करण्यात आले असून सरपंच विठ्ठल ठाकरे यांच्या हस्ते नारळ फोडून उदघाटन करण्यात आले
यावेळी डॉ.आंबेडकर यांचा पुतळ्याची जागा सुद्धा नियोजित करण्यात आली असून यावेळी उपसरपंच अनिता भामरे सर्व ग्रा.प.सदस्य,बचत गटाध्यक्ष कविता भामरे, भैया पानपाटील, सुदाम पानपाटील, सागर पाटील, बुवाभाई साळवे, जितेंद्र पानपाटील,राजू भामरे, उत्तम निकम, राहुल रावताळे, गौतम साळवे, भीमराव साळवे,जितू साळवे,ओंकार साळवे, ओंकार पावरा, अजित पटले व ग्रामस्थ उपस्थित होते.प्रास्ताविक भैया पानपाटील व सूत्रसंचालन अशोक अहिरे यांनी केले.