नंदूरबार l प्रतिनिधी
अनेक दिवसांपासून देवमोगरा पुनर्वसन, वाण्याविहिर, मिठाफळी शिवारात बिबट्याचा मुक्त वावर सुरु आहे.त्यामुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मात्र दि.9 रोजी संध्याकाळच्या सुमारास तालुक्याच्या सीमेवरील गुजरात राज्यातील जावली येथे बिबट्याला गुजरात वनविभागाने जेरबंद केले आहे त्यामुळे जेरबंद करण्यात आलेला बिबट्या कोणता याबाबत नागरिकां मध्ये उत्सुकता पसरली आहे.
मागील तीन महिन्या पुर्वी खापर ब्राम्हणगाव परिसरात बिबट्यांचा मुक्त संचार होता त्यामुळे या परिसरात भीती युक्त वातावरण होते . दि.30 जानेवारी रोजी याच परिसरात एका बिबट्याला वन विभागाने जेरबंद केले होते. त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. मागील आठवड्यात देवमोगरा पुनर्वसन शिवारात शेतातील घराच्या अंगणातुन 7 वर्षीय बालकाला बिबट्याने फरफटत नेत ठार केले होते. व परिसरात बिबट्याचा मुक्त वावर सुरु असल्याचे सांगितले जात होते.
त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.त्यामुळे वन विभागाच्या वतीने देवमोगरा पुनर्वसनच्या शेत शिवारात पिंजरा लावुन बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न होत होते. मात्र तालुक्याच्या सीमेलगत असलेल्या गुजरात राज्यातील भागात बिबट्याला गुजरात वनविभागाने जेरबंद केल्याने जेरबंद करण्यात आलेला बिबट्या कोणता याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.