नंदूरबार l प्रतिनिधी
तळोदा शहरात भारतीय जनता पार्टी वतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गौरवार्थ “स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा” चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वीर सावरकर जी के सम्मान में,तळोदा शहर मैदान में ! अश्या घोषणा यावेळी कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या. गौरव यात्रा चे आयोजन शहरातील दत्त मंदिर पासून ते बिरसा मुंडा चौक येथे संपन्न झाली. प्रखर देशभक्त, सशस्त्र क्रांतीचे कडवे समर्थक, तसेच प्रखर हिंदूवादी स्वातंत्र्यवीर विनायकराव दामोदर सावरकर ज्यांच्यावर वारंवार अपमान जनक व बदनामीचे आक्षेपार्ह विधान काँग्रेस पक्षाकडून व राहुल गांधींच्या कडून सुरू आहेत. त्याचा निषेधार्थ तळोदा शहरात भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस महामंत्री विजय चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत “स्वातंत्रवीर सावरकर गौरव” यात्रा चे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी, राहुल गांधींनी केलेल्या आक्षेपार्प विधानाचा कडाडून निषेध करत. यावेळी आ. राजेश पाडवी म्हणाले की,केवळ राजकीय स्वार्थापोटी स्वातंत्र्यवीर सावरकरांना सातत्याने बदनाम करण्याचे षडयंत्र राहुल गांधीच्या माध्यमातून सुरू आहे. यांचे संपूर्ण हिंदुस्थानातून निषेध होत असुन. या निषेधार्थ संपूर्ण हिंदू समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. तसेच याच काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या इंदिरा गांधींनी ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गौरव केला’ होता.
हे आज ते विसरलेत या देशातील हिंदू समाज काँग्रेसला आठवण करून दिल्याशिवाय राहणार नाही. असे पाडवी म्हणाले.
ज्वलंत हिंदूत्वाचे विचार तसेच राष्ट्र प्रेमाचे प्रतीक असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जयघोष करत. संपूर्ण तळोदा शहरातील सकल हिंदू समाज स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गौरवार्थ यात्रेत सहभागी झाले.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष अजय परदेशी, शहराध्यक्ष योगेश, माजी उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, डॉ.शशिकांत वाणी, माजी नगरसेवक संजय माळी, जितेंद्र सूर्यवंशी, (माळी), जिल्हा महामंत्री बळीराम पाडवी, पंतप्रधान आत्मनिर्भर भारत जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी जिल्हा सरचिटणीस निलेश माळी माजी उपनगराध्यक्ष गौरव वाणी, तालुका अध्यक्ष प्रकाश वळवी शहर अध्यक्ष योगेश चौधरी तळोदा पंचायत समिती उपसभापती विजय राना, भरत चौधरी तालुका प्रभारी नारायण ठाकरे शिरीष माळी जितेंद्र माळी रामानंद ठाकरे जालंदर भोई, हेमलाल मगरे, प्रदीप शेंडे, अमन जोहरी, धारासिंग वसावे, कौशल सवाई, किरण सूर्यवंशी, ग्रामपंचायत सरपंच सदस्य, जि प सदस्य, प स सदस्य, सरपंच सदस्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.