धडगाव l प्रतिनिधी
“एन इ पी -2020″अंगणवाडी सेविका सक्षमीकरण प्रशिक्षण कार्यशाळा के. रुपसिंग दादा पराडके अध्यापक विद्यालय जुने धडगाव येथे संपन्न झाली. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार व एकात्मिक बाल विकास विभाग जिल्हा परिषद, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्टार्स प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविका सक्षमीकरण प्रशिक्षणाच्या उद्घाटनाप्रसंगी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नंदुरबार अधिव्याख्याता सुभाष वसावे यांनी. सक्षम सेविका सक्षम राष्ट्र निर्माण करू शकतात, नवीन शैक्षणिक धोरण नुसार सेविकाची भूमिका बदलली आहे.हा बदल काळानुसार स्वीकारणे गरजचे आहे. तसेच महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी येवळे यांनी स्थानिक भाषेत संवाद साधला व मार्गदर्शन केले.

जिजामाता शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे प्राध्यापक सायसिंग वळवी यांनी आधुनिक तंत्रज्ञानचा क्रांतिकारी वापर याविषयी मार्गदर्शन केले. तसेच साधनवक्ती गटसाधन केंद्र धडगाव आमशा वळवी यांनी अंगणवाडी सेविका आणि बाल संगोपन याविषयी मार्गदर्शन केले. अध्यापक विद्यालय जुने धडगाव येथील प्राचार्य बटेसिंग पावरा यांनी मोबाईलचा परिणामकारक वापर याविषयी मार्गदर्शन. केले.अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती अश्विनी करंके व श्रीमती हर्षना पिंगळे यांनी सर्व अंगणवाडी सेविका व अंगणवाडी पर्यवेक्षिका यांना दोन गटात वर्गीकरण करून मोबाईल द्वारा प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून घेतले.

आणि व्हिडिओ पाहण्यामध्ये येणाऱ्या अडचणी या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन व शंका समाधान केल्या. स्टार्स प्रकल्प अंतर्गत अंगणवाडी सेविका ऑनलाईन प्रशिक्षण कार्यशाळेचे जिल्हा नोडल अधिकारी म्हणून रणजीत कुऱ्हे महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी, प्रकल्प शहादा यांनी सहकार्य केले. सदर कार्यशाळेचे सूत्रसंचालन व आभार अध्यापक विद्यालय प्राध्यापक सचिन जळोदकर यांनी तर प्रशिक्षणाचे संपूर्ण नियोजन व आयोजन विषय तज्ज्ञ आमशा वळवी यांनी केले.