शहादा l प्रतिनिधी
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 75X75X75 अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना व महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि आर्टिस्टिक ह्यूमन्स यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि. 23 मार्च रोजी शहीद दिनाचे औचित्य साधून आझाद हिंदची गाथा या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी महाराष्ट्रातील एक हजाराहून अधिक विद्यार्थी, कलाकार आणि नाट्यनिर्माते महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यात एकाच दिवशी 75 महाविद्यालय 75 ठिकाणी 75 नाट्य प्रयोग सादर करीत होते. या अनोख्या प्रकार प्रकल्पात नंदुरबार जिल्ह्यातील शहादा महाविद्यालयाची निवड झाली होती.
शहादा महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी सदर नाटकात सहभाग घेतला.सदर नाटकाच्या तयारीसाठी रासेयो प्रमुख प्रा.राजेंद्र पाटील आणि सर्व स्वयंसेवक कलाकार यांनी विशेष परिश्रम घेतले. सदर नाटकात सहभागी झालेल्या सर्व कलावंतांचे पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, मानद सचिव श्रीमती कमलताई पाटील,शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक प्रा.मकरंद पाटील, प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील उपप्रचार्य डॉ. एम. के. पटेल, यांनी कौतुक केले. प्रा.डाॅ. वजीह अशहर व प्रा.डाॅ. वर्षा चौधरी यांचे सहकार्य लाभले.