खेतिया l प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय गुर्जर दिवसानिमित्त येथील कृषी भवन येथे प्रतिमा पूजन व अभिवादनाचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
अखिल भारतीय गुर्जर महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष बापूसाहेब दीपक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रतिमा पूजनासह अभिवादन करण्यात आले.गुर्जर सम्राट मिहीर भोज , सरदार वल्लभभाई पटेल व स्व.आण्णासाहेब पी.के. पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आंतरराष्ट्रीय गुर्जर दिवस साजरा करण्यात आला.उपस्थित प्रमुख पदाधिकारी व अतिथींनी आंतरराष्ट्रीय गुर्जर दिवसानिमित्त मनोगत व्यक्त केले.
ह्या प्रसंगी अखिल भारतीय गुर्जर महासभेचे राष्ट्रीय महामंत्री सुनीलभाई पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मोहन चौधरी, गुजरात प्रदेश कार्यकारी अध्यक्ष जगदीश पटेल, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष किशोर पटेल, महाराष्ट्र प्रदेश सदस्या अनामिका चौधरी, प्रदेश सदस्य प्रा. आर. टी. पटेल, युवा नेते मयूर पाटील तसेच अखिल भारतीय युवा गुर्जर महासभेचे राष्ट्रीय सचिव डॉ. प्रियांक पाटील, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. प्रफुल्ल पाटील, महाराष्ट्र प्रदेश संयोजक हितेश पटेल, नंदुरबार विभागीय अध्यक्ष उज्वल पटेल, शहादा विभागीय अध्यक्ष योगेशपाटील, तळोदा विभागीय अध्यक्ष मनोज पाटील, प्रदेश सोशल मीडिया प्रभारी श्रीराम पाटील, डॉ. पुंजा पटेल, अनिल पाटील, निलेश पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.