नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील काकर्दे येथे ग्रामपंचायत कार्यालयात संरपंच पुंडलिक मराठे यांच्या संकल्पनेतून तसेच सेवा माॅम सामाजिक संस्थेच्या वतीने मोफत वैद्यकीय तपासणी -आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.

जगातील ६६ टक्के कष्टाची कामे महिलाच करित असतात, ग्रामीण भागातील महिला हे स्व आरोग्याकडे दुर्लक्ष करित असतात महिलांच्या आरोग्यास प्राधान्य देत हे वैद्यकीय तपासणी -आरोग्य शिबीर केवळ महिला वर्गासाठी आयोजित करण्यात आले होते.
या वैद्यकीय तपासणी- आरोग्य शिबीरास महिला वर्गाचा प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. महिलांच्या सोयीसाठी क्रमा क्रमाने नियोजन पूर्वक वैद्यकीय तपासणी शिबिर आयोजित करण्याचा मानस आहे अशी माहिती संरपंच पुंडलिक भापकर (मराठे) यांनी दिली. यावेळी उपसरपंच किरण मराठे, कांतिलाल ठाकरे, इतर ग्रामपंचायत सदस्य तसेच रविंद्र बागुल, राकेश माळी, विठोबा माळी, नारायण मराठे इ मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शालिग्राम ठाकरे, छायाताई माळी, शोभाताई मराठे,शारदाताई माळी तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.