रयत शेतकरी संघटनेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष राहुल दिलीप सोनार यांची रयत शेतकरी संघटनेच्या समन्वयक समिती (कोअर कमिटी) च्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
राहुल सोनार यांनी रयत शेतकरी संघटनेच्या नंदुरबार जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी हाती घेतल्यानंतर संघटना वाढीसाठी जिल्हाभरात भरीव कामगिरी केली. संघटनेच्या माध्यमातून शेतकर्यांसह अनेक सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी ते प्रयत्नशिल आहेत. शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविप्रकाश देशमुख यांनी राहुल सोनार यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची कोअर कमिटीच्या सदस्यपदी निवड केली आहे. सोनार यांच्या निवडीबद्दल रयत शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सुनील ठोसर, युवक विभागीय अध्यक्ष शिवाजी महाजन, कार्याध्यक्ष गोपाल माळी, विभागीय संघटक संदीप पाटील, विभागीय अध्यक्ष संजय पाटील यांच्यासह महाराष्ट्रातील सर्व पदाधिकार्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात.