नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील घोडजामणे, नवागाव, शेही, करंजाळी व बोरपाडा येथील जनावरांमध्ये ‘लम्पी स्किन डिसीज’ या साथरोगाचा निष्कर्ष होकारार्थी आल्याने सदर रोगाचा प्रसार जिल्ह्यातील इतर ठिकाणी होऊ नये यासाठी पशुपालकांनी त्यांच्याकडे असलेल्या 4 महिने वयोगटावरील गाय व म्हैस वर्गातील सर्व निरोगी पशुंना साथीच्या रोगापासून सुरक्षित ठेवण्यासाठी लसीकरण करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त नंदुरबार यांनी केले आहे.
लम्पी स्किन डिसीज रोग प्रतिबंधक लसीकरणासाठी जिल्हा परिषदेकडून 2 लाख 50 हजार गोट पॉक्स लसीची मात्रा प्राप्त झाली असून लसीचे वाटप क्षेत्रीय पशुवैद्यकीय संस्थाना त्याच्या कार्यक्षेत्रातील गायी व म्हशींच्या वर्गातील पशुधन संख्येनुसार वाटप करण्यात आले आहे. त्यानुसार क्षेत्रीय पशुवैद्यकीय संस्थाना 17 सप्टेंबर पासून लसीकरणास सुरुवात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.