शहादा l प्रतिनिधी
मलोणी ता.शहादा येथील युवा कार्यकर्ते संघरत्न अनिल कुवर यांची युवक काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष कुणाल राउत हे गुरूवारी शहादा येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी आले होते.त्यांच्या प्रमुख उपस्थितीत नंदुरबार युवक काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस
पदी संघरत्न अनिल कुवर यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ नेते सुभाष पाटील,युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्की पाटील,तालुकाध्यक्ष डाॅ.सुरेश नाईक,अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मकसुद खाटीक,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रजनीताई नाईक,तुषार गोसावी आदिंची प्रमुख उपस्थिती होती.संघरत्न कुवर यांनी निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले आहे की, काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणानुसार विचार जिल्ह्यातील ग्रामीण भागात पोहोचविण्यासाठी प्रयत्न करू.सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सतत कार्यरत राहू.त्याच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.