नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार ते तळोदा रोड वरील सुर्दशन पेट्रोल पंपाजवळ वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकने पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस गाडीला धडक दिल्याने पोलीस निरीक्षकांसह तीन पोलीस गंभीर जखमी झाल्याची घटना आज पहाटे घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज पहाटे 3 ते 4 वाजे दरम्यान रात्री गस्त घालणाऱ्या पोलीस ( क्र-MH- 12 SQ-1048) या वाहनावर तळोदा येथून नंदुरबार येथे परत येत असतांना तळोदा ते नंदुरबार रस्त्यावरील सुर्शन पंट्रोपपा जवळ नंदुरबारहुन वाकाचार रस्त्याकडे जाणारी मालट्रक (क्र.MH-14 FT-5167) वरील चालक सचिन दशरथ शिरसाठ याने त्यांच्या ताब्यातील मालट्रक रस्त्याच्या परिस्तितीकडे दुर्लक्ष करुन हयगयीने व भरधाव वेगाने ट्रक चालवुन जात असताना पोलीस वाहनाला जबर धडक दिली.
या अपघातात पोलिस निरीक्षक राजेंद्र दगडु भावसार नेम-नियंत्रण कक्ष नंदुरबार, पोकाँ प्रकाश परशुराम कोकणी नेम-पोलीस मोटार वाहन विभाग नंदुरबार, पोकाँ रविद्र सुकलाल सावळे नेम-पोलीस मुख्यालय नंदुरबार, पोकाँ रविद्र सुकलाल सावळे पोलीस मुख्यालय नंदुरबार यांना गंभीर दुखापत झाली.याप्रकरणी पोकाँ रविद्र सुकलाल सावळे यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात सचिन दशरथ शिरसाठ रा.नाशिक यांच्या विरुद्ध भा..दं.वि. कलम 279,337,336,427 सह मो. वा. का. क 184/187 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सपोनि दिनेश भदाणे करीत आहेत.