नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार शहरास तालुक्यातील नळवा येथे काही दिवसांपुर्वी कोरोनारूग्ण आढळले होते.आज जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात एक कोरोना रूग्ण आढळुन आला आहे.
नंदुरबार जिल्ह्यात दोन दा कोरानामुक्त झाल्यानंतर दि.७ सप्टेंबर रोजी तालुक्यातील नळवे येथे कोरोना रुग्ण आढळला होता. त्यानंतर १० सप्टेंबर रोजी नंदुरबार शहरातील हरचंद नगर येथील एकाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता.दरम्याने आज दि.१६ सप्टेंबर रोजी प्रशासनातर्फे ९४ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली पैकी तळोदा तालुक्यातील नर्मदा नगर येथील एकाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.सद्या जिल्ह्यात दोन कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहे,तर जिल्ह्याबाहेर दोघांवर उपचार सुरू आहे.
आतापर्यंत नंदुरबार जिल्ह्यात ३७ हजार ५३५ रुग्ण आढळले आहेत.त्यात नंदुरबार तालुक्यात १५ हजार ९५९, शहादा तालुक्यात १ हजार ६३८, तळोदा तालुक्यात ३ हजार ६६९ , नवापूर तालुक्यात ४ हजार १११, अक्कलकुवा तालुक्यात १ हजार १९६ , धडगाव तालुक्यात ८६२ कोरोना रुग्ण आढळले आहेत.पैकी ३६ हजार ५८३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर जिल्ह्यात आतापर्यंत ९५० जणांचा मृत्यू झाला आहे. नंदुरबार जिल्ह्यात पॉझिटीव्ह रेट १५.९५, मृत्यू दर २.३६, बरे होण्याचे प्रमाण ९७.६२ टक्के आहे.नंदुरबार जिल्ह्यात सध्या विविध सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गर्दीत न जाता शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करत, आपली व कुटुंबाची काळजी घेणे आवश्यक आहे.