प्रकाशा l प्रतिनिधी
प्रकाशा येथे तापी पूलावरुन एका अनोळखी महिलेने उडी घेतल्याची घटना घडली.यावेळी सुमारे दीड किमी अंतरापर्यंत महिलेचा शोध घेण्यात आला . मात्र महिला आढळून आली नाही . पोलिसांतर्फे शोध घेण्यात येत आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , काल दि .१६ सप्टेंबर रोजी नंदुरबारकडून येणाऱ्या काही नागरिकांनी एका अनोळखी महिलेला तापी पुलावरून उडी घेतांना दिसले . नागरिकांनी तात्काळ प्रकाशा पोलीसांशी संपर्क साधला.यावेळी घटनास्थळी पोहेकॉ . सुनिल पाडवी , रामा वळवी , विवेक शिरसाठ , अजित नागलोद आदींनी घटनास्थळी धाव घेतली . यावेळी परिसरात गणेश विसर्जननिमित्ताने बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलीस निरीक्षक श्री.वाघ व पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली.महिलेने उडी घेतल्यानंतर तिचा शोध घेण्यासाठी गावातील पट्टीचे पोहणारे सीताराम भगत यांच्या पथकास तात्काळ प्रकाशा पोलिसांनी घटनास्थळी बोलावून यांत्रिकी बोटीच्या साहाय्याने शोध मोहीम राबविण्यात आली होती . परंतु सदर महिलेचा शोध घेतला असता मिळून आली नाही . सदर महिलेचे नाव , गाव , पत्ता समजुन आला नसल्याने अज्ञात महिलेने उडी घेतली असल्याची माहिती शहादा पोलिसांना कळविण्यात आली आहे.काल रात्री सायंकाळी उशिरापर्यंत महिलेचा शोध घेण्यात येत आहे .