Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खूनाच्या गुन्ह्यातील ३९ वर्षापासुन फरार असलेल्या आरोपीस नवापूर पोलीसांनी ठोकल्या बेड्या

team by team
March 13, 2023
in क्राईम
0
खूनाच्या गुन्ह्यातील ३९ वर्षापासुन फरार असलेल्या आरोपीस नवापूर पोलीसांनी ठोकल्या बेड्या

नंदुरबार | प्रतिनिधी

नवापूर तालुक्यातील तिनटेंबा येथील खूनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील ३९ वर्षापासुन फरार असलेल्या संशयीत आरोपीस नवापूर पोलीसांनी गुजरात राज्यातुन अटक केली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, फत्तेसिंग बाबजी मावची रा. तिनटेंबा ता. नवापुर जि. नंदुरबार याच्या विरुध्द् नवापुर पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम ३०७ प्रमाणे दि.१२ फेब्रुवारी १९८४ रोजी गुन्हा दाखल होता. गुन्हा दाखल झाल्यापासून आज पर्यंत ३९ वर्षापासून संशयीत आरोपी फत्तेसिंग बाबजी गावीत हा फरार होता. १३ मार्च रोजी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,

 

 

नमुद गुन्हयातील फरार संशयीत आरोपी फत्तेसिंग बाबजी मावची हा व्यारा शहरातील एका कापड मिलमध्ये मजुरीला असून तो त्याची पत्नी व तिन मुलांसह गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यातील आमली पोस्ट वझरदा ता. सोनगढ येथे वास्तव्यास राहात असल्याची माहीती मिळाल्याने, सदरची माहिती त्यांनी नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना सांगितल्याने श्री. वारे यांनी यांनी सदर बातमीची खात्री करुन फरार आरोपीला अटक ककरण्यासाठी नवापूर पोलीस ठाण्याचे एक पथक तात्काळ गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यात रवाना केले.

 

 

 

नवापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यातील व्यारा शहर गाठून तेथे फरार आरोपी फत्तेसिंग बाबजी मावची याचा शोध घेण्यास सुरुवात केली, परंतु आरोपी हा ३९ वर्षापासून फरार असल्याने त्याचा फोटो किंवा इतर माहिती पथकाकडे नव्हती तसेच तो सहज कोठे बाहेर येत नाहीत व आपले अस्तित्व लपवून वेषांतर करुन फिरत होता. त्यामुळे त्यास ओळखणे कठीण झाले होते.
नवापूर पोलीस ठाण्याच्या पथकाला आरोपीताबाबत इत्थंभूत माहिती काढण्यात पथकाला यश मिळाले व नमुद आरोपी हा व्यारा शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. नवापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने व्यारा रेल्वे स्टेशन परिसरात सापळा लावून त्याचा शोध घेत असतांना त्याठिकाणी सुमारे ६० ते ६५ वर्षाचा एक इसम फिरतांना दिसला.

 

 

 

 

पथकाने त्या इसमाला आवाज देताच त्याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला म्हणून नवापूर पोलीस ठाण्याच्या पथकाला संशय आल्याने त्यास पोलीसांनी त्यास पाठलाग करुन शिताफीने फत्तेसिंग बाबजी मावची रा. तिनटेंबा ता. नवापुर जि. नंदुरबार ह. मु. आमली पोस्ट वझरदा ता. सोनगढ जि. तापी ( गुजरात) यास ताब्यात घेवुन आरोपी हा वरील गुन्हयातील फरार आरोपी असल्याची खात्री झाल्याने त्यास ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे.३९ वर्षापासून फरार आरोपीतास बेड्या ठोकून उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या पथकास पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी नवापूर पोलीस ठाण्याच्या पथकास १० हजार रुपये रोख बक्षिस जाहीर केले.

 

 

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार उप विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली नवापुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, पोलीस उपनिरीक्षक अशोक मोकळ,पोलीस हवालदार दादाभाऊ वाघ, नितीन नाईक, सुनिल निकम यांच्या पथकाने केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

भालेर येथे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्यासह पोलीस दलाचा आज होणार भव्य नागरी सत्कार

Next Post

मोठी बातमी : चालत्या बसमध्ये प्रवाश्याचा मृत्यू , मयत शहादा तालुक्यातील रहिवासी

Next Post
ब्रेकिंग न्यूज : बॅटरीचा स्फोट झाल्याने ट्रक पेटून चालक जागीच ठार

मोठी बातमी : चालत्या बसमध्ये प्रवाश्याचा मृत्यू , मयत शहादा तालुक्यातील रहिवासी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add