चिनोदा.ता.तळोदा । वार्ताहर
तळोदा तालुक्यातील चिनोदा येथील रूचिका अरुण चव्हाण हिने नेमसुशील विद्यामंदिरात आयोजित हर्षोत्सव २०२३ डान्स स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले.
तळोदा येथील नेमसुशिल बालसंस्कार विद्यामंदिरातील ज्युनिअरची विद्यार्थींनी रूचिका चव्हाण हिने हर्षोत्सव २०२३ यात डाॅन्स स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल तिला विद्यामंदिराच्या वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यात माजी नगराध्यक्ष अजय परदेशी, माजी नगरसेवक गौरव वाणी यांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
त्यासाठी तिला मुख्याध्यापिका पुष्पा बागुल, वर्गशिक्षिका अलका पाडवी आदींचे मार्गदर्शन लाभले. तिच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष निखिल तुरखिया, डी.एम.महाले, संजय पटेल, सोनाबेन तुरखिया, मुख्याध्यापिका, वर्गशिक्षिका तसेच शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी तिचे अभिनंदन केले आहे. तसेच रूचिक चव्हाण ही चिनोदा येथील शेतकरी अरुण चव्हाण यांची मुलगी आहे.








