नंदूरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत सोरापाडा अंतर्गत सोरापाडा व गलोठा गावात तसेच ग्रुप ग्रामपंचायत अक्कलकुवा अंतर्गत अक्कलकुवा शहरात विधान परिषद आमदार आमश्या पाडवी यांचा स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत आमदार निधितुन विविध ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसवण्यात येणार आहे. सदर कामांचे भूमिपूजन विधान परिषद आमदार आमश्या पाडवी व जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती शंकर पाडवी यांचा हस्ते करण्यात आले.
यावेळी सोरापाडा येथे भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी ग्रुप ग्रामपंचायत सोरापाडा लोकनियुक्त सरपंच अंजूताई पाडवी, उपसरपंच ताराबाई तडवी, ग्रा.प.सदस्य छोटूलाल पडवी, गणेश माळी, विमलबाई मराठे, जेष्ठ नेते पृथ्वसिंग पडवी, माजी सरपंच काना नाईक, युवा नेते कुणाल जैन सह ग्रामस्थ उपस्थित होते.
तसेच अक्कलकुवा येथे भूमिपूजन कार्यक्रमात ग्रुप ग्रामपंचायत अक्कलकुवा लोकनियुक्त सरपंच सौ. उषाबाई बोरा, उपसरपंच इम्रान मक्रानी, प.स.उपसभापति अमृत वसावे, माजी सरपंच टेडग्या वसावे, जेष्ठ नेते पृथ्वीसिंग पाडवी, विक्रमसिंग चंदेल, किरण चौधरी, रवि चौधरी, नाना पाटिल, राजु पवार, युवासेना जिल्हा समन्वयक रोहित चौधरी, शहर प्रमुख रविंद्रसिंग चंदेल, उप तालुका प्रमुख तुकाराम वळवी, किशोर ठाकुर, ग्रामपंचायत सदस्य अमरसिंग वसावे, दिपक पाडवी, गोलू चंदेल, युवानेते कुणाल जैन, स्वप्निल जैन, शाकिब पठान, राजू पाटिल, भीकमचंद चव्हाण, अश्विन सोनार, भटू बोरा, नासिर बलोच, पार्थ लोहार, सह पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.








