शहादा l प्रतिनिधी
नाशिक विभागीय पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजीत तांबे यांनी पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयास दि.5 मार्च रविवारी सदिच्छा भेट दिली.

यावेळी मंडळाच्या कार्यालयात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात आ.तांबे यांचे स्वागत व सत्कार मंडळाचे संचालक रमाकांतभाई पाटील, मयूरभाई पाटील, समन्वयक प्रा. मकरंद पाटील यांच्या हस्ते अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील यांच्यावतीने करण्यात आले. या सदिच्छा भेटप्रसंगी आ.तांबे यांनी विविध विषयांवर चर्चा केली.पेन्शन योजना, अंगणवाडी सेविका व मदतनीस वेतन, विनाअनुदानित शाळांचे प्रश्न आदि विषयांवर सकारात्मक विचार मांडले.या भेटीच्या वेळी मंडळ संचलित विविध ज्ञानशाखा व विद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक आणि प्रा.मकरंद पाटील साहेब युवा मंचचे सदस्य उपस्थित होते.








