Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथे पोलीस मुख्यालयातील लॉन टेनीस मैदानाचे नुतनीकरण

शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी मैदानी खेळ आवश्यक -डॉ. बी.जी. शेखर पाटील

team by team
March 6, 2023
in क्राईम
0
नंदुरबार येथे पोलीस मुख्यालयातील लॉन टेनीस मैदानाचे नुतनीकरण

नंदुरबार |  प्रतिनिधी

 

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर पाटील यांच्या हस्ते पोलीस मुख्यालय आवारातील लॉन टेनीस मैदानाचे नुतनीकरण व  सरसेनापती संताजी असे नामकरण केलेल्या फलकाचे अनावरण करण्यात आले.
त्यावेळी त्यांनी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील व इतर अधिकारी यांचे समवेत लॉन टेनीस खेळाचा आनंद लुटला.

 

 

सरसेनापती संताजी हे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक शौर्य गाजवलेले योध्दा असून त्यांनी काही काळ नंदुरबार जिल्ह्यात वास्तव्य केल्याचे दाखले इतिहासात आढळून येतात. त्यांनी आपल्या पराक्रमाने मुघल सत्तेला नामोहरण केल्याचे इतिहासातील साहित्यात नमुद आहे. त्यांच्या पराक्रमाचा उजाळा म्हणून २००७ साली तयार केलेल्या लॉन टेनीस मैदानाचे नुतनीकरण करुन त्यास  सरसेनापती संताजी टेनीस मैदान असे नाव दिल्याचे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सांगितले.

 

यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी सांगितले की, खेळ हे मानवी जिवनासाठी अत्यंत महत्वाचे आहे खेळामुळे वेळेचे बंधन, धैर्य, शिस्त, गटामध्ये काम करण्याची वृत्ती, आत्मविश्वास या गुणांची वृध्दी होते. पोलीस दलात काम करीत असतांना सततचे बंदोबस्त, कामाचा ताण यामुळे शारीरिक स्वास्थ्याकडे पोलीसांचे कायमच दुर्लक्ष होते. सततच्या या कामाच्या व्यापातून बाहेर पडून पोलीस दलात काम करणार्‍या पोलीस अधिकारी व अमलदार यांना आपल्या स्वास्थ्याकडे लक्ष दिले पाहिजे. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी मैदानी खेळ हे एक महत्वाचे साधन आहे असे सांगितले. दररोज शक्य नसले तरी आठवड्यातून शक्य असेल तेवढ्या वेळा ते स्वत: लॉन टेनीस खेळत असल्याचे याप्रसंगी त्यांनी सांगितले.याप्रसंगी पोलीस मुख्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.

 

 

सदर कार्यक्रमाच्या वेळी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर पाटील, पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार उपविभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, अक्कलकुवा उपविभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत, शहादा उपविभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, पोलीस उप अधीक्षक विश्वास वळवी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर, जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

बोरद येथील व्यापार्‍याची दहा लाखात फसवणुक

Next Post

शहाद्यात भाजपाची बूथ सशक्तीकरण कार्यशाळा उत्साहात

Next Post
शहाद्यात भाजपाची बूथ सशक्तीकरण कार्यशाळा उत्साहात

शहाद्यात भाजपाची बूथ सशक्तीकरण कार्यशाळा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

November 4, 2026
दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add