नंदुरबार | प्रतिनिधी
केळी मालाची रक्कम न देता एका व्यापार्याची ९ लाख ७६ हजारात फसवणूक झाली आहे. याप्रकरणी उत्तर प्रदेशातील वाहिद फ्रुट कंपनीचे प्रो.वाहिद अहसान ईलाही याच्याविरूध्द तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळोदा तालुक्यातील बोरद येथील भोलेशंकर जोगेंद्रसिंग यांचे तळोदा येथे जोंगेंद्रसिंग फ्रुट ऍड व्हेजीटेबल कंपनी आहे. उत्तर प्रदेशातील वाहिद फ्रुट कंपनीचे प्रो.वाहिद अहसान ईलाही यांनी केळी मालाची मागणी केली. त्यानुसार भोलेशंकर जोगेंद्रसिंग यांनी केळीचा माल भरून २९ लाख २० हजार ८४३ रूपये किंमीची केळी पाठविली वाहिद अहसान ईलाही यांनी १९ लाख ४४ हजार रूपये दिले. परंतु उर्वरीत केळीची ९ लाख ७६ हजार ८४३ रूपये देण्यास वाहिद ईलाही याने उडवाउडवीची उत्तरे देत फसवणूक केली.
याबाबत भोलेशंकर जोगेंद्रसिंग यांनी तळोदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार वाहिद फ्रुट कंपनीतर्फे प्रो.प्रा.वाहिद अहसानी ईलाही याच्याविरूध्द भादंवि कलम ४२०, ४०६, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि अमितकुमार बागुल करीत आहेत.