म्हसावद l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील रोषमाळ खुर्द ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच सौ.रिता लक्ष्मण पटले यांनी दिलेल्या माहितीनुसार,मागील वर्षी 31 मार्च 2022 रोजी सुरू झालेली अक्कलकुवा डेपो ची बससेवा पावसाळ्यात रस्ता खराब झाल्याने बंद झाली.परंतु परिसरातील नागरिक व जि.प. सदस्या सौ.संगीताताई पावरा यांच्या प्रयत्नाने रस्ता दुरुस्त करण्यात आला आणि पुन्हा एस.टी.बससेवा सुरू व्हावी आणि या अतिदुर्गम नर्मदा परिसरातील विद्यार्थी,कर्मचारी आणि नागरिकांची तालुक्याच्या ठिकाणी येण्या जाण्याची गैरसोय दूर व्हावी,करिता रोषमाळ खुर्द ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच तसेच उपसरपंच,सदस्य आणि परिसरातील नागरिकांनी केलेल्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे,तसेच अक्कलकुवा डेपो मॅनेजर कुलकर्णी ,धुळे विभागीय वाहतुक अधिकारी सौरभ देवरे ,धुळे विभागीय वाहतुक अधिक्षक अवस्थी ,धुळे विभागीय वाहतुक निरीक्षक वडनेरे या सर्व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे धुळे विभागीय अधिकारी यांनी दखल घेतल्यामुळे आणि केलेल्या प्रयत्नामुळेच दि. 27 फेब्रुवारी 2023 रोजी मुक्कामी बससेवा सुरू करण्यात आली.
यामुळे या परिसरातील जवळपास 24 गावातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी येण्याजाण्याची सोय होणार असल्याने रोषमाळ खुर्द ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच तसेच उपसरपंच,सदस्य आणि परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे तसेच सरपंच च्या हस्ते बस ची आरती ओवाळून नारळ फोडून पुजा करण्यात आली व बस चे वाहक-चालक दोघांचे स्वागत सत्कार करण्यात आले आणि सरपंच सौ.रीता पटले यांच्या कडून राज्य परिवहन धुळे विभागीय अधिकारी आणि अक्कलकुवा डेपो मैनेजर या सर्वांचे आभार मानले नागरिकांना









