Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सोराचापाडा येथे दुचाकी घसरल्याने एकाचा मृत्यू

team by team
February 27, 2023
in क्राईम
0
पती-पत्नीस मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल

नंदूरबार l प्रतिनिधी

अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी ते वडफळी रस्त्यावर सोराचापाडा येथे दुचाकी घसरल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अक्कलकुवा तालुक्यातील बालाघाट येथील पाशा गोमा वसावे हा त्याच्या ताब्यातील दुचाकीवर (क्र.एम.एच.३९ एई ४१८२) जलसिंग गोमा वसावे यांना बसवून मोलगी येथील गाव दिवाळी पाहून घरी जात होते. यावेळी मोलगी ते वडफळी रस्त्यादरम्यान पाशा वसावे याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात दुचाकी चालवून सोराचापाडा येथील मुलांच्या वस्तीगृहाजवळ अचानक दुचाकी घसरल्याने दोघे जण खाली पडली.

 

 

यात पाशा वसावे याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मोलगी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पाठविले. त्यानंतर सुरत येथील नवीन जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता औषधोपचारादरम्यान पाशा वसावे याचा मृत्यू झाला. याबाबत जलसिंग वसावे यांच्या फिर्यादीवरुन मोलगी पोलिस ठाण्यात मयत पाशा वसावे याच्याविरोधात भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, ४२७ सह मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.राजेंद्र गावित करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

इलेक्ट्रिक मोटारसह पाईप-वायर चोरी

Next Post

वालंबा गावाजवळ वाहनाची दुचाकीला धडक

Next Post
वालंबा गावाजवळ वाहनाची दुचाकीला धडक

वालंबा गावाजवळ वाहनाची दुचाकीला धडक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add