नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील डोंगरगाव येथे गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदन दिल्याच्या वाईट वाटल्याने व फोनवर शिवीगाळ करत असल्याच्या संशयातून दोन गटात वाद झाल्याने यात चौघांना दुखापत झाली असून परस्पर फिर्यादीतून दोन्ही गटातील सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा तालुक्यातील डोंगरगाव येथील रमेश सुरेश भील यांनी शहादा गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदन दिले. याचे वाईट वाटून रमेश भील यांना राजेंद्र भरत ठाकरे याने लोखंडी फायटरने डोळ्याजवळ मारुन दुखापत केली. तसेच रमेश भील यांचे भाऊ विकास यांना यमुनाबाई भरत ठाकरे हिने बोचकून घेतले. तसेच राकेश भरत ठाकरे, रुपाली राकेश ठाकरे इंदाबाई परमत यांनी शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत रमेश भील यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात भादंवि कलम १४३, १४७, ३२४, ३२३, ५०६, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अभिजीत अहिरे करीत आहेत. तसेच याप्रकरणी विलमबाई परभत कुवर यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे की, विमलबाई यांचा नातू राजेंद्र ठाकरे हा फोनवर होता. यावेळी रमेश भील यांनी विमलबाई यांचा नातू राजेंद्र ठाकरे हा शिवीगाळ करत असल्याचा गैरसमज करुन रमेश भील याने विमलबाई कुवर यांच्या गालावर थापड मारुन खाली पाडले. तसेच राजंेद्र ठाकरे यास रमेश भील व विकास भील यांनी मारहाण केली. याबाबत विमलबाई कुवर यांच्या फिर्यादीवरुन दोघांविरोधात भादंवि कलम ३२४, ३३७, ३२३, ५०४, ५०६, ३४ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्य पोलिस उपनिरीक्षक अभिजीत अहिरे करीत आहेत.








