Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वीजचोरी करणाऱ्या शहाद्यातील दोघांना सहा महिन्याच्या कारावास, सत्र न्यायालयाचा निकाल

team by team
February 25, 2023
in क्राईम
0
तिन राज्यात मोटार सायकल चोरी करणारी टोळी झाली जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, आठ दुचाकी जप्त
नंदुरबार l  प्रतिनिधी
वीजचोरीच्या वेगवेगळ्या प्रकरणांत दोषी आढळलेल्या दोन आरोपींना शहादा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने नुकतीच सहा महिन्याच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. शहाद्यातील संजय ताराचंद चौधरी व श्रीधर रमेश चौधरी अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 
     महावितरणच्या नाशिक येथील भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विनय काळे, सहायक अभियंता ए.जी. चव्हाण, कनिष्ठ अभियंता आर.के. गायकवाड, कनिष्ठ तंत्रज्ञ एल.एम. सोनवणे यांच्या पथकाने शहादा येथे तपासणी मोहीम राबवली. ८ डिसेंबर २०१५ रोजी केलेल्या तपासणीत गोविंदनगरमध्ये राहणाऱ्या श्रीधर रमेश चौधरी याने मीटरमध्ये फेरफार करून ३ लाख १८ हजार ६८० रुपयांची वीजचोरी केल्याचे आढळून आले. तर ९ डिसेंबर २०१५ रोजी या तपासणीत महालक्ष्मीनगरमध्ये राहणाऱ्या संजय ताराचंद चौधरी याने मीटरला जॅमर लावून ३ लाख ११ हजार ३१० रुपयांची वीजचोरी केल्याचे आढळून आले. 
दोन्ही आरोपींनी वीजचोरीचे निर्धारित बिल न भरल्याने त्यांच्यावर विद्युत कायद्याच्या कलम १३५ अन्वये पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.  पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करून शहादा येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सी.एस. दातीर यांच्यासमोर खटल्याची सुनावणी चालली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपी संजय ताराचंद चौधरी व श्रीधर रमेश चौधरी सहा महिन्याची साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. सरकारी वकील एस. ए. गिरासे यांनी महावितरणची बाजू मांडली. 
बातमी शेअर करा
Previous Post

औरंगाबादचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे नाव ‘धाराशिव’, केंद्र सरकारची मंजुरी

Next Post

उद्योजकांनी युवकांच्या कुशलतेचा भरघोस सॅलरी पॅकेज देवून सन्मान करावा : डॉ. विजयकुमार गावित

Next Post
उद्योजकांनी युवकांच्या कुशलतेचा भरघोस सॅलरी पॅकेज देवून सन्मान करावा : डॉ. विजयकुमार गावित

उद्योजकांनी युवकांच्या कुशलतेचा भरघोस सॅलरी पॅकेज देवून सन्मान करावा : डॉ. विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add