नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार शहरात बारावीची परीक्षा सुरू असतांना मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांविरूध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील डी.आर.हायस्कुल येथे बारावीचे पेपर सुरू आहेत. यादरम्यान जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी परीक्षा केंद्राचा परिसरातील १०० मीटर अंतरात मनाई आदेश लागू केले आहे. असे असतांना परिक्षार्थी यांना कॉपी पुरविण्याच्या उद्देशाने फिरणार्या रोहित राजेंद्र बोरसे रा.शनिमांडळ ता.नंदुरबार, स्वामी छोटू चौधरी रा.चौधरीगल्ली (नंदुरबार) यांच्याविरूध्द भादंवि कलम १९८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.