नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार येथे पंतप्रधान सुक्ष्म अन्न प्रक्रिया उदयोग योजनेतर्ंगत स्टेंट बँकेकडुन एकाच दिवशी ५५ लाभार्थ्याचे कर्ज प्रकरणे मंजुर करण्यात आले. कर्ज मजुरीचे आदेशाचे वाटप खा.डॉ. हिना गावित यांच्या हस्ते कर्ज वितरण करण्यात आले.
नंदुरबार जिल्हयासाठी १५० वैयक्तिक लाभार्थ्याना उदयोग उभारणीचे लक्षांक देण्यात आलेले होते. या ५५ प्रकरणांसह जिल्हयाचे भौतिक व आर्थिक लक्षांक साध्य झाले आहे. भारतीय स्टेंट बँक ही जिल्हयाची अग्रणी बँक असल्याने सदर योजना समजुन घेण्यासाठी त्यांनी कृषि विभागांच्या अधिकान्यासोबत बँकेचे विभागीय तसेच राज्य अधिकान्या समवेत सभा आयोजित केलेली होती. त्यामध्ये पंतप्रधान सुक्ष्म अन्न प्रक्रिया उदयोग योजनेचे राज्यस्तरीय बँकींग तज्ञ सुनिल रामटेके यांच्या उपस्थितीत सभा संपन्न झाली. सदर सभेमध्ये स्टेट बँकेच्या अधिकार्यांनी योजनेचे महत्व जाणून घेतले तसेच संपूर्ण जिल्हयात स्टेट बँकेकडे प्रलंबित असलेले सर्वच प्रस्ताव मंजुर करण्यात आले. यामध्ये तालुका नवापुर २२, शहादा १३, नंदुरबार १०, अक्कलकुवा ६, तळोदा २ व अक्राणी २ असे एकुण ५५ प्रस्ताव मंजुर करण्यात आले.
याप्रसंगी नंदुरबार जिल्हयामध्ये प्रक्रिया उदयोगासाठी खुप मोठा वाव असल्याने जास्तीत जास्त लोकांनी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन खा.डॉ. हिना गावित यांनी केले. याशिवाय उदयोग व्यवसाय यशस्वी व्हावे यासाठी लाभार्थ्याचा स्वहिस्सा केंद्र व राज्य शासनाकडुन अनुदान तसेच बँकेकडुन कर्ज अशी तिहेरी सांगड योजनेत घालून देण्यात आली आहे. यामुळे व्यवसाय बंद पडणे किंवा बँकेचे कर्ज बुडित होणे असे प्रकार कमीत कमी प्रमाणात होतात. सदयाचे युग हे आरोग्याबाबत जागरुकीचे असून सेंद्रीय मालास जगभरात फार मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. आणि नंदुरबार जिल्हा हा सेंद्रीय फळे व अन्नधान्य यांची बाजारपेठ आहे. त्यामुळे पंतप्रधान सुक्ष्म अन्न प्रक्रिया उदयोग योजनेतर्ंगत सेंद्रीय पदार्थ तयार करुन त्यावर सेंद्रीय असल्याचा ब्रॅण्ड तयार करुन बाजारपेठा काबिज करावे. असे आवाहन ही खा.डॉ. हिना गावित यांनी केले. सदर ५५ उदयोग हे मिरची कांडप, दाल मिल, राईस मिल दुग्धव्यवसाय, आईल मिल, हळदी कांडप, शेवाळी व कुरडाया उदयोग, मसाले प्रक्रिया, केळी वेर्फस, पिठ तयार करुन पॅकींग करुन विकणे, गुळ गुर्हाळ इ. व्यवसायासाठी कर्ज मंजुरी करण्यात आली.
नंदुरबार जिल्हयातील जमीन व हवामान यातील विविधता पाहता केळी, पपई, मिरची, कांदा, तादुळ, विविध प्रकारच्या दाळी, तसेच भगर, राई, नागली, नाचणी, राळा, कोद्रा इ. पिकांसाठी प्रक्रिया उदयोगांस फार मोठया प्रमाणात वाव असल्याने जास्तीत जास्त लोकांनी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषि विभागातील नोडल ऑफिसर विजय मोहित यांनी केले.याप्रसंगी भारतीय सिमाचे संरक्षण करणार्या शहिद झालेल्या जवानांच्या कुंटुबियांना भारतीय स्टेट बँकेकडुन ५० लाख सानुग्रह अनुदान धनादेश वितरीत करण्यात आला. शहीद मनोज लक्ष्मणराव गायकवाड या शहीद जवानांच्या पत्नी रुपाली मनोज गायकवाड यांना धनादेश सुपूर्त करण्यात आला.तसेच सुरजित कुमार शहा क्षेत्रिय प्रबर्धक, धुळे अजय वाल्हे, मुख्य प्रबर्धक, धुळे विनोद राऊत, मुख्य प्रबर्धक, नंदुरबार राजेश मिश्रा, मुख्य प्रबर्धक, नंदुरबार, तसेच कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी, जिल्हा संसाधन व्यक्ती आदी उपस्थित होते.








