नंदुरबार | प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील खेडका येथे बोर व दुरूस्तीचा कारणावरून तसेच दारूचा छापा कारवाई करीता सांगितल्याचा संशय घेवून पती पत्नीस मारहाण करून दरोडा टाकत ७ लाख ७४ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल लंपास केल्याप्रकरणी ८ जणांविरूध्द नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवापूर तालुक्यातील खेकडा गावातील शासकीय आश्रम शाळेच्या मागील बाजूस फिर्यादी नितेश अरविंद गावीत यांचे घर आहे. खेकडा गावातील बंद पडलेले बोअरवेल दुरूस्तीचा कारणावरून तसेच निलेश गावीत यांनी पोलीसांनी दारूचे छापा टाकून कारवाई करावी. असा संशय घेवून आमश्या अर्जुन मावची यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून नितेश गावीत याच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करत त्यांना हाताबुक्यांनी मारहाण केली तसेच त्यांची पत्नीस शिवीगाळ करून जिवेठार मारण्याची धमकी दिली.
अमिशा अर्जुन मावची व इतरांनी घरातील किचनमधील कपाट उघडून त्यातील ड्राव्हरमधून १ लाख ६८ हजार ५०० रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने २० हजार रूपये रोख, ६ हजार रूपये किंमतीचे दोन मोबाईल तसेच मोटरगाडी (क्र.जी.जे.२६ ए.बी.१०७६) असा एकूण ७ लाख ७४ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला.तसेच गाडी चालू करून जबदस्तनी घेवून गेले तसेच व ही गाडी तालुक्यातील झामणझर शिवारातील रस्त्यावर गाडी जाळुन नुकसान केले. म्हणून नितेश अरविंद गावीत रा.खेकडा ता.नवापूर यांच्या फिर्यादीवरून अमिषा अर्जुन मावची, कमलेश रतिलाल मावची, कैलास रतिलाल मावची, मानसिंग वसंत गावीत, सोमा जेठा मावची, रविंद्र शिडया गावीत, दिपक इसर्या गावीत सर्व रा.खेकडा ता.नवापूर फुलसिंग सखाराम गावीत रा.झरणपाडा (ता.उच्छल, गुजरात) यांच्याविरूध्द नवापूर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३९५, ४५२, ३२३, ५०४, ५०६, ७२७, ४३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोउनि मनोज पाटील करीत आहेत.








