Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथे समता सैनिक दलातर्फे पथसंचलन

team by team
February 15, 2023
in राज्य
0
नंदुरबार येथे समता सैनिक दलातर्फे पथसंचलन

नंदुरबार | प्रतिनिधी

 

नंदुरबार येथे भारतीय बौद्ध महासभेच्या समता सैनिक दलाच्यावतीने ध्वजारोहण करीत शहरातुन पथसंचलन करण्यात आले.
यावेळी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभेच्या समता सैनिक दलाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रीय संरक्षक कमांडर इन चीफ महाउपासिका मीराताई आंबेडकर, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या आदेशान्वये माता रमाई यांच्या १२५ व्या जयंती निमित्ताने समता सैनिक दलाचे पथसंंचलन घेण्यात आले होते.

 

 

याबाबतीत समता सैनिक दलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष स्टॉफ ऑफिसर मुंबई एस के भंडारे यांनी सांगितले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सन १९२७ साली समता सैनिक दलाची स्थापना केली, चवदार तळ्याचा सत्याग्रह केला त्याच्या तयारीसाठी मिल्ट्रीमध्ये ज्याप्रमाणे ड्रिल शिकवले जाते, त्याप्रमाणे समता सैनिक दलालाही ड्रिल शिकवण्याचं काम सुरू असल्याचे सांगितले, तसेच समाजामध्ये जे काही लोकांवर अन्याय अत्याचार होत आहेत, त्याबाबत जनजागृती निर्माण करण्याचे काम या माध्यमातून करीत असल्याचे त्यांनी सांगितले, यावेळी नंदुरबार शहरातील जुन्या पोलीस कवायत मैदानावर समता सैनिक दलाचे ध्वजारोहण समता सैनिक दलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष स्टॉफ ऑफिसर मुंबई एस.के.भंडारे यांच्या हस्ते करण्यात आले,

 

 

 

व नंदुरबार शहरातील नेहरू पुतळामार्गे, नवीन नगरपालिका, शास्त्री मार्केट, स्मारक चौक, सोनार गल्ली, जळका बाजार मार्गे, साक्री नाक्यावरील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात हे पथसंचलन घेण्यात आले. या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली, यावेळी नंदुरबार जिल्हा समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद आल्हाट, समता सैनिक दलाचे नाशिक विभागीय सचिव के.वाय.सुरवाडे, असिस्टंट लेफ्टनंट जनरल हेडकॉटर सचिव प्रशिक्षक डी.एम.आचार्य, महाराष्ट्र राज्य मेजर जनरल उपाध्यक्ष प्रशिक्षक व्हि.डि.हिवराळे, समता सैनिक दलाचे नाशिक पश्चिमचे अध्यक्ष भिकाजी कांबळे, पश्चिम जळगावचे अध्यक्ष डी.के.संसारे, जळगाव पूर्वचे अध्यक्ष शैलेंद्र जाधव, अहमदनगरचे अध्यक्ष सुगंध इंगळे, मनमाड समता सैनिक दलाचे कमांडर गौतम कर्डक,

 

 

 

नाशिक पूर्व समता सैनिक दलाचे कर्नल हिरामण वानखेडे, समता सैनिक दल जळगावचे कर्नल युवराज नरवाडे, जळगावचे केंद्रीय शिक्षक बौद्धाचार्य सिद्धार्थ सोनवणे तसेच भारतीय बौद्ध महासभा नंदुरबार शाखेचे सर्व पदाधिकारी व समता सैनिक दलाचे सैनिक या पथसंचालनात सहभागी झाले होते, तसेच भारतीय बौद्ध महासभेचे नंदुरबार शाखेचे पदाधिकारी संघटक भरत निकुंभे, नामदेव चक्रे, जिल्हा सचिव डॉक्टर अर्जुन निकुंभे,  अशोक मगरे, रमेश शिरसाट, मगन भामरे यांच्या सह समता  सैनिक सुनंदा शिरसाठ,सुनिता वाघ,लिलाबाई भामरे,केवलबाई वाघ, वंदना निकुंभे,सुदंरा आल्हाट,सारिका कूवर,रत्नाप्रभा बर्डे सविता मेश्राम,सुनिता अहिरे, संध्या पिंपळे, वैशाली बोराळे ,सत्वशिला गोस्वामी, निर्मला पानपाटील,आदींनी संचलनात सहभाग, घेतला होता. संचलनानंतर इदिरा गांधी मंगल कार्यालय येथे कार्यक्रम चा समारोप करण्यात आला. यावेळी सूत्रसंचालन नामदेव चक्रे यांनी सूत्रसंचालन केले.आभार प्रदर्शन भरत निकुंभे माजी कोषाध्यक्ष यांनी केले.यावेळी सविता मेश्राम व रत्नाप्रभा बर्डे यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी समता सैनिक दलाचे  महिला व पुरुष  उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

मराठा सेवा संघातर्फे २६ मार्च रोजी खान्देशस्तरिय वधुवर परिचय मेळाव्याचे आयोजन

Next Post

राज्यस्तरीय शालेय टेनिक्वाईट क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन, आठ विभागातून ३३६ खेळाडूंचा सहभाग

Next Post
राज्यस्तरीय शालेय टेनिक्वाईट क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन, आठ विभागातून ३३६ खेळाडूंचा सहभाग

राज्यस्तरीय शालेय टेनिक्वाईट क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन, आठ विभागातून ३३६ खेळाडूंचा सहभाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add