Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मराठा सेवा संघातर्फे २६ मार्च रोजी खान्देशस्तरिय वधुवर परिचय मेळाव्याचे आयोजन

team by team
February 15, 2023
in राजकीय
0
मराठा सेवा संघातर्फे २६ मार्च रोजी खान्देशस्तरिय वधुवर परिचय मेळाव्याचे आयोजन

नंदुरबार | प्रतिनिधी

 

धुळे जिल्हा मराठा सेवा संघाच्या वधुवर सुचक व सामुदायिक विवाह कक्षाच्या वतीने दि.२६ मार्च रोजी खान्देशस्तरीय वधु वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर नुकतेच वधु वर नोंदणी कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्याबाबत जनजागृती व वधु-वरांची नोंदणी खान्देशभर करण्यात येणार असुन याचा प्रारंभही यावेळी होणार आहे.

 

 

खान्देशातील मराठा समाजातील उपवर मुला-मुलींचे विवाह जुळुन येण्यासाठी भव्य वधुवर सुचक व पालक परिचय मेळाव्याचे दि.२६ मार्च रोजी सकाळी ९ वाजता हिरेभवन स्टेशन रोड, कोर्टा शेजारी धुळे येथे आयोजन करण्यात आले आहे. सदर मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आकर्षक व माहितीपर अशी वधुवर नोंदणी पुस्तिका प्रकाशित केली जाणार आहे. त्याकरिता नावनोंदणीही सुरू झाली आहे. या मेळाव्यासाठी व पुस्तिकेत समाविष्ट होण्यासाठी समाज बांधवांनी आपल्या पाल्यांचे नाव त्वरित नोंदणी करुन घ्यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. याकामी प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आली आहे,

 

 

 

तसेच संतोषराव सुर्यवंशी यांच्याशी संपर्क साधावा किंवा मराठा सेवा संघाचे कार्यालयातही नोंदणी कक्ष सुरु आहे. तसेच ज्या समाजबांधव व भगिनींना वधुवर सुचक कक्षाचे प्रतिनिधी म्हणून आपल्या प्रभागात व गांवात कार्य करायचे असेल त्यांनीही संपर्क साधावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. वधु-वरांच्या नावनोंदणीसाठी मराठा सेवा संघाच्या कार्यालयाबरोबरच, मेळाव्याचे मार्गदर्शक संतोषराव सुर्यवंशी (९४२३७ ०३५८१), मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील (मो.नं. ९९२१९ ३३९९९), वधुवर सुचक कक्षाचे अध्यक्ष पी.एन.पाटील (मो.नं. ९४२१४ ३१०२०), सचिव एच.ओ.पाटील (मो.नं.९४२१४ १३७२१), रंगराव पाटील (८८०६३ ६६०२१), , उमेश सुधाकर शिंदे (९४२३२ ८९४२१), नुतनताई पाटील (८०८७८ ०८८७२) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच ज्यांना सामुदायिक विवाह सोहळ्यात आपला विवाह लावायचा असेल त्यांनीही संपर्क साधावा असे आवाहन मराठा सेवा संघ व वधु वर कक्ष जिल्हा कार्यकारणीने केले आहे.

 

 

 

या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मराठा सेवा संघाच्या कार्यालयात वधु वर कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नियोजित मेळाव्याचे मार्गदर्शक संतोषराव सूर्यवंशी, सेवा संघाचे अध्यक्ष संदीप पाटील, सचिव एस.एम.पाटील, वधु वर कक्षाचे अध्यक्ष पी.एन.पाटील, एच.ओ. पाटील, नूतन पाटील, सुलभा कुवर, वसुमती पाटील, नितीन पाटील, प्रा.सुनील पवार, उमेश शिंदे, गुलाबराव देवरे, साक्री तालुका अध्यक्ष अनिल अहिरे, डी.एल.साळुंखे, ऐ.बी.मराठे, दादाभाऊ पाटील, नंदकुमार शिंदे, प्रा.बी.ए.पाटील, मधुकर पाटील, युवराज पाटील , रामकृष्ण पाटील, मिलन पाटील, शाम निरगुडे, रंगराव पाटील, प्रवीण पाटील, संजय पाटील,डी ए पाटील, राहुल देवरे,वनराज पाटील, बी  ए पाटील,प्रा सोनवणे, अनंत पाटील,प्रा डॉ सदाशिव सुर्यवंशी, रामकृष्ण पाटील, प्रविण पाटील,आदींसह मराठा सेवा संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्तविक संदीप पाटील, सुत्रसंचलन एस.एम.पाटील तर आभार प्रदर्शन पी.एन.पाटील यांनी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

धान उत्पादकांना प्रती हेक्टरी १५ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम, १ हजार कोटी रुपये खर्चास मान्यता

Next Post

नंदुरबार येथे समता सैनिक दलातर्फे पथसंचलन

Next Post
नंदुरबार येथे समता सैनिक दलातर्फे पथसंचलन

नंदुरबार येथे समता सैनिक दलातर्फे पथसंचलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add