नंदुरबार | प्रतिनिधी
धुळे जिल्हा मराठा सेवा संघाच्या वधुवर सुचक व सामुदायिक विवाह कक्षाच्या वतीने दि.२६ मार्च रोजी खान्देशस्तरीय वधु वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर नुकतेच वधु वर नोंदणी कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्याबाबत जनजागृती व वधु-वरांची नोंदणी खान्देशभर करण्यात येणार असुन याचा प्रारंभही यावेळी होणार आहे.
खान्देशातील मराठा समाजातील उपवर मुला-मुलींचे विवाह जुळुन येण्यासाठी भव्य वधुवर सुचक व पालक परिचय मेळाव्याचे दि.२६ मार्च रोजी सकाळी ९ वाजता हिरेभवन स्टेशन रोड, कोर्टा शेजारी धुळे येथे आयोजन करण्यात आले आहे. सदर मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आकर्षक व माहितीपर अशी वधुवर नोंदणी पुस्तिका प्रकाशित केली जाणार आहे. त्याकरिता नावनोंदणीही सुरू झाली आहे. या मेळाव्यासाठी व पुस्तिकेत समाविष्ट होण्यासाठी समाज बांधवांनी आपल्या पाल्यांचे नाव त्वरित नोंदणी करुन घ्यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. याकामी प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आली आहे,
तसेच संतोषराव सुर्यवंशी यांच्याशी संपर्क साधावा किंवा मराठा सेवा संघाचे कार्यालयातही नोंदणी कक्ष सुरु आहे. तसेच ज्या समाजबांधव व भगिनींना वधुवर सुचक कक्षाचे प्रतिनिधी म्हणून आपल्या प्रभागात व गांवात कार्य करायचे असेल त्यांनीही संपर्क साधावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. वधु-वरांच्या नावनोंदणीसाठी मराठा सेवा संघाच्या कार्यालयाबरोबरच, मेळाव्याचे मार्गदर्शक संतोषराव सुर्यवंशी (९४२३७ ०३५८१), मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील (मो.नं. ९९२१९ ३३९९९), वधुवर सुचक कक्षाचे अध्यक्ष पी.एन.पाटील (मो.नं. ९४२१४ ३१०२०), सचिव एच.ओ.पाटील (मो.नं.९४२१४ १३७२१), रंगराव पाटील (८८०६३ ६६०२१), , उमेश सुधाकर शिंदे (९४२३२ ८९४२१), नुतनताई पाटील (८०८७८ ०८८७२) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच ज्यांना सामुदायिक विवाह सोहळ्यात आपला विवाह लावायचा असेल त्यांनीही संपर्क साधावा असे आवाहन मराठा सेवा संघ व वधु वर कक्ष जिल्हा कार्यकारणीने केले आहे.
या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मराठा सेवा संघाच्या कार्यालयात वधु वर कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नियोजित मेळाव्याचे मार्गदर्शक संतोषराव सूर्यवंशी, सेवा संघाचे अध्यक्ष संदीप पाटील, सचिव एस.एम.पाटील, वधु वर कक्षाचे अध्यक्ष पी.एन.पाटील, एच.ओ. पाटील, नूतन पाटील, सुलभा कुवर, वसुमती पाटील, नितीन पाटील, प्रा.सुनील पवार, उमेश शिंदे, गुलाबराव देवरे, साक्री तालुका अध्यक्ष अनिल अहिरे, डी.एल.साळुंखे, ऐ.बी.मराठे, दादाभाऊ पाटील, नंदकुमार शिंदे, प्रा.बी.ए.पाटील, मधुकर पाटील, युवराज पाटील , रामकृष्ण पाटील, मिलन पाटील, शाम निरगुडे, रंगराव पाटील, प्रवीण पाटील, संजय पाटील,डी ए पाटील, राहुल देवरे,वनराज पाटील, बी ए पाटील,प्रा सोनवणे, अनंत पाटील,प्रा डॉ सदाशिव सुर्यवंशी, रामकृष्ण पाटील, प्रविण पाटील,आदींसह मराठा सेवा संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्तविक संदीप पाटील, सुत्रसंचलन एस.एम.पाटील तर आभार प्रदर्शन पी.एन.पाटील यांनी केले.








