नंदुरबार l प्रतिनिधी
येथील नंदुरबार शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे आज महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी राजीनामा देऊन राज्याच्या राज्यपाल पदावरून पायउतार झाल्याबद्दल फटाके फोडून व जनतेला पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला.
भगतसिंह कोश्यारी यांनी महापुरुषयांबद्दल अनेक आक्षेपार्ह आणि वादग्रस्त विधाने केली होती. यामुळे ते वादाच्या भोवर्यात सापडले होते. त्यांच्या विरोराधात राज्यात अनेक आंदोलने झाली. त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत होती. विरोधकांनी देखील त्यांच्या राजीनामा घेण्याची मागणी केली होती. भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई आणि ठाण्याबद्दल त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
त्यानंतर समर्थ रामदास यांच्याविना छत्रपती शिवाजी महाराजांना कोण विचारेल? असं वादग्रस्त वक्तव्य केल्याने पुन्हा ते अडचणीत आले होते. चाणक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल? समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? गुरुचं आपल्या समाजात मोठं स्थान असतं, तसंच छत्रपतींनी मला माझं राज्य तुमच्या कृपेने मिळालं आहे, असं समर्थांना म्हटलं, अशा आशयाचं वक्तव्य कोश्यारींनी केलं होतं. तसेच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत देखील कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
भगतसिंह कोशारी यांनी राजीनामा दिल्यामुळे आज नंदुरबार शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे फटाके फोडून व जनतेला पेढे भरवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजित मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव राऊ मोरे यांच्या नेतृत्वाखाली हा आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष कमलेश चौधरी, युवक शहराध्यक्ष लल्ला मराठे, युवक संघटक जितु ठाकरे, ओबीसी सेलचे समन्वयक निलेश चौधरी, प्रशांत मोरे, राजु शिंदे, मच्छिंद्र शिंदे, पवन चव्हाण, मुकेश ठाकरे, पप्पू कोतवाल, अजय पाडवी, अर्जुन राठोड, सोनू गोंधळी आदी उपस्थित होते.








