म्हसावद l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हातील शहादा तालुक्यात तापी नदीचा काठावर वसलेलं प्रकाशा हे एक तीर्थ-क्षेत्र. यालाच आपण दक्षिण काशी म्हणून प्रख्यात आहे. प्रकाशा येथे तापी पुलावर नेहमीच रहदारी असते.आज सकाळी अकरा वाजता प्रकाशा येथील तापी नदी पुलावर उसाने भरलेल्या ट्रॅक्टरचा अपघात होऊन अधांतरी कठड्यावर लटकलेले आहे. ट्रॅक्टर चालक थोडक्यात बचावले आहे. अपघात प्रकरणी कोणालाही दुखापत झालेली नाही.

प्रकाशा येथील पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल रामा वळवी कृष्णा जाधव घटनास्थळी तात्काळ पोहोचले. वाहतूक एक तासभर वाहनांचा चक्काजाम होऊन गेलेला होता. पोलिसांना मदत म्हणून प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावित, वैजाली येथील वैभव विद्यालयाचे शिक्षक प्रशांत पाटील, काथरदे खुर्द येथील शिक्षक नितीन पाटील यांनी वाहतूक सुरळीतपणे करण्यासाठी पोलीस प्रशासनाला मदत केली. वाहतूक सुरळीतपणे सुरू झाली. पोलीस कॉन्स्टेबल रामा वळवी, कृष्णा जाधव यांनी शिक्षकांचे कौतुक केले. नागरिकांनी नवीन पूल लवकरात लवकर व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.








