अक्कलकुवा l प्रतिनिधी
अक्कलकुवा शहरालगत असलेल्या सोरापाडा येथे सुरू असलेल्या यात्रोत्सवात काल रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास यात्रेत फिरणाऱ्या टारगट पोरांनी मुलीची छेड काढण्यावरून गोंधळ निर्माण झाल्याची घटना घडली.bपोलिसांनी हस्तक्षेप करून वाद मिटवून यात्रेत फिरणाऱ्यांना हुसकावून लावत यात्रेतील सर्व मनोरंजनाचे साधने बंद करून यात्रेत सुरू असलेला झन्ना- मन्ना मात्र सुरू ठेवला होता, याबाबत अक्कलकुवा शहरात एकच चर्चा सुरू आहे.
अक्कलकुवा शहरालगत असलेल्या सोरापाडा येथे दि. 5 फेब्रुवारीपासून श्री महाकाली मातेचा यात्रोत्सव सुरू आहे, गेल्या चार दिवसापासून सुरळीत सुरू असलेल्या या यात्रोत्सवात काल दिनांक 8 फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास यात्रेत फिरणाऱ्या काही टारगट पोरांनी एका मुलीची छेड काढली, यावेळी वादावादी होऊन काहीसे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिस प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करून वाद मिटवला,
यात्रेत सुरू असलेल्या सर्व मनोरंजनाच्या साधनांना बंद करण्यात येऊन, यात्रेत फिरणाऱ्यांना माघारी पाठवण्यात आले, सर्वच बंद केल्यानंतर मात्र यात्रेत सुरू असलेला झन्ना-मन्ना सुरळीतपणे सुरू होता, याबाबत शहरात एकच चर्चा सुरू असून, यात्रेत झालेल्या या वादामुळे पुन्हा दुसरा वाद उफाळून आला. यावेळी दोन गटांमध्ये बाचाबाची होऊन किरकोळ मारहाणीचा प्रकार देखील घडला मात्र याची पोलीसात अधिकृत नोंद झाली नाही.








