Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणातील अमर्याद संधी : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

विविध शासकीय इमारतींच्या निर्मितीतून कामकाज गतीमान होणार

Mahesh Patil by Mahesh Patil
February 9, 2023
in राजकीय
0
नंदुरबार जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणातील अमर्याद संधी : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार l प्रतिनिधी

 

 

जेवढा दुर्गम भाग असेल तेवढ्या आरोग्याच्या समस्या जटील असतात; अशा परिस्थितीत वैद्यकीय शिक्षण घेताना जे ज्ञान विद्यर्थ्यांना मिळेल ते जगाच्या पाठीवर कुठेही मिळू शकत नाही त्यामुळे नंदुरबार सारख्या दुर्गम जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाच्या अमर्याद संधी आहेत. तसेच जिल्ह्याच्या रौप्य महोत्सवी वर्षात विविध विभागांच्या निर्माण होणाऱ्या स्वतंत्र इमारतींमुळे प्रशासकीय कामगाज गतीमान व अधिक सुविधांनीयुक्त होईल, असा विश्वास आज राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी व्य्यक्त केला आहे.

 

 

ते आज नंदुरबार शहरात माता व बाल संगोपन रूग्णालय, अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र समिती, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतींच्या पायाभरणी समारंभ प्रसंगी बोलत होते. यावळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, आमदार आमश्या पाडवी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक जिल्हा परिषदेच्या सभापती हेमलता शितोळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्याकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारूदत्त शिंदे, वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकरे जिल्हा आरोग्य डॉ. गोविंद चौधरी तसेच जात पडताळणी समितीचे सहआयुक्त गिरीष सरोदे, अन्न व औषध प्रशासनाचे सह-आयुक्त विभागीय गणेश परळीकर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता वैशाली पाटील, तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी, विवध यंत्रणांचे अधिकारी व नागरिक याप्रसंगी उपस्थित होते.

 

 

यावेळी बोलताना डॉ. विजयकुमार गावित म्हणाले, या जिल्ह्याची निर्मिती अत्यंत आग्रहपूर्वक व दूरदृष्टिकोनातून केली करण्यात आली आहे. पालकमंत्री या नात्याने विवध उपक्रम, योजना, संसाधनांची निर्मिती करून जिल्ह्याच्या पालन-पोषणाच्या जबाबदारीचे निर्वहन अत्यंत सुक्ष्म नियोजन व दृष्टिकोनातून केले जाईल, असाही विश्वास त्यांना यावेळी उपस्थितांना दिला. तसेच पुढे ते म्हणाले, गुजरात, मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या या भागाचा विकास केवळ स्वतंत्र जिल्हा निर्मितीमुळे आपण करू शकलो. नंदुरबार जिल्ह्यासोबत व त्यानंतरही ज्या जिल्ह्यांची निर्मिती झाली त्या जिल्ह्यांच्या तुलनेत नंदुरबार चा विकास अत्यंत वेगाने व शाश्वत स्वरूपात आपण करतो आहोत.

 

 

लवकरच वैद्यकीय महाविद्यालयातून पदवी घेतलेली पहिली बॅच बाहेर येणार असून या महाविद्यालयातून शिक्षण घेवून बाहेर पडणारे विद्यार्थी नक्कीच स्वत:ला भाग्यशाली समजतील एवढ्या क्लिष्ट स्वरूपाची रुग्णसेवा त्यांच्या हातून शिक्षण घेतानाच होते आहे. त्यामुळे जगातील कुठल्याही आरोग्य समस्येला सहज उपाय करणारे विद्यार्थी येथे घडलेले आपल्याला दिसतील. लवकरच वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतींचा पायाभरणी समारंभ होणार असून 41 एकर च्या परिसरात सुसज्ज, सर्व सुविधांनीयुक्त असे वैद्यकीय शिक्षण संकुल आपल्याला पहावयास मिळणार आहे. त्याचबरोबर लवकरच येथे वैद्यकीय शिक्षणाचे पदव्युत्तर अभ्यासक्रमही सुरू करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री डॉ. गावित यांनी देवून विविध इमारतींच्या पायाभरणीस शुभेच्छाही त्यांनी यावेळी दिल्या आहेत.

 

 

जिल्ह्यातील प्रत्येक बालकाचे पोषण करणार : डॉ. सुप्रिया गावित

जिल्ह्यातील कुठलेही बालक पोषणापासून वंचित राहणार नाही याची काळजी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून घेतली जात आहे. कामाच्या निमित्ताने परराज्यात स्थालांतरित होणाऱ्या मजूराच्या मुलांना ट्रॅक करून ते ज्या राज्यातील गावात स्थलांतरित होत आहेत तेथे अंगणवाडी व प्रशासनाच्या समन्वयातून पोषण आहार दिला जात आहे. जिल्ह्यातील प्रत्येक बालकाचे पोषण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वचनबद्ध असल्याचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी सांगितले.

 

 

कुपोषणमुक्त जिल्हा म्हणून ओळख निर्माण करणार: 
डॉ. हिना गावित

कुपोषण आणि बालमृत्युचा शिक्का आपल्या जिल्ह्याला बसला असून हा शिक्का पुसून काढण्याची पायाभरणी म्हणजे हे माता व बाल संगोपन रूग्णालय असून जिल्ह्यातील प्रत्येक माता व जन्माला येणारे बालक हे सुदृढ व निरोगी राहील यासाठी देशातील उपलब्ध सर्वोच्च साधन-सामुग्री व सुविधा या रूग्णालयात केल्या जाणार आहेत. केंद्र सरकारच्या माध्यमातून या रूग्णालयाची निर्मिती केली जात असून त्यासाठी कुठल्याही प्रकारची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे आश्वासन यावेळी खासदार डॉ. हिना गावित यांनी दिले.

बातमी शेअर करा
Previous Post

 राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी योगेश्वर बुवा तर सचिव पदी प्रभू तडवी यांची नियुक्ती

Next Post

केंद्रात पुन्हा भाजप आले तर सवलती अन् संविधान संपेल : माजी मंत्री ॲड.पाडवी

Next Post
केंद्रात पुन्हा भाजप आले तर सवलती अन् संविधान संपेल : माजी मंत्री ॲड.पाडवी

केंद्रात पुन्हा भाजप आले तर सवलती अन् संविधान संपेल : माजी मंत्री ॲड.पाडवी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एस.ए. मिशनमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त अभिवादन व सांस्कृतिक कार्यक्रम

एस.ए. मिशनमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त अभिवादन व सांस्कृतिक कार्यक्रम

January 5, 2026
राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त माजी खा.डॉ. हिना गावित यांनी केली अभिवादन

राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त माजी खा.डॉ. हिना गावित यांनी केली अभिवादन

January 5, 2026
आ.चंद्रकांत रघुवंशींच्या नगरसेवकांना कामाला लागण्याच्या सूचना,शहरातील प्रभाग १ मध्ये रस्ते विकास कामाचे भूमिपूजन

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या नगरसेवकांना कामाला लागण्याच्या सूचना,शहरातील प्रभाग १ मध्ये रस्ते विकास कामाचे भूमिपूजन

January 5, 2026
कृषी उत्पन्न बाजार समितीत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार

कृषी उत्पन्न बाजार समितीत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार

January 5, 2026
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक 2025, मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर : डॉ. मित्ताली सेठी

नायलॉन मांजा: वापरासाठी 50 हजार, तर विक्रीसाठी अडीच लाखांचा दंड प्रस्तावित

December 31, 2025
जुगार अड्ड्यावर धाड, 14 लाखाचा मुद्देमाल जप्त, दोन राज्यातील 40 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जुगार अड्ड्यावर धाड, 14 लाखाचा मुद्देमाल जप्त, दोन राज्यातील 40 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

December 31, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group