नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार शहरात दोन धर्मात तेढ निर्माण होईल असे व्हॉट्अप स्टेटस ठेवले म्हणून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात चार जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबार शहरातील चार युवकांनी आपल्या मोबाईलवर दोन धर्मात तेढ निर्माण करणारे व्हॉट्अप स्टेटसमुळे सार्वजनिक शांतता टिकण्यास भादक होईल अशी कृती करून सदर धार्मिक कारणावरून दोन धर्मामध्ये एकोपा टिकण्यास बाधक ुती केले म्हणून पोलीस नाईक नरेंद्र देविदास देवराज याचा फिर्यादीवरून दिनेश देविदास भोपे रा.गुरूकूलनगर, २ (नंदुरबार), जितेश राजु श्रीखंडे रा.गोंधळीगल्ली (नंदुरबार) यांच्याविरूध्द भादंवि कलम ५०५, (१) (ब) (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पुढील तपास पोसई प्रविण पाटील करीत आहेत. तर दुसर्या घटनेत पोलीस हवालदार सुनिल वामन मोरे यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात पवन राजेंद्र माळी रा.लहान माळीवाडा, सागर सुरेश लोहार (रा.हटदरवाजा, एकनंबर शाळेजवळ,नंदुरबार) यांच्याविरूध्द भादंवि कलम १, ५०५, (१) (ब) (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचाप्रकरणी पुढील तपास पोसई सागर आहेर करीत आहेत.








