नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील रनाळे गावाजवळ डम्पर उलटल्याने सहचालक ठार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार तालुक्यातील वळवद येथील चालक गणेश देविदास पटेल हा त्याच्या ताब्यातील डम्पर (एम.एच. ३९ सी २९७७) सहचालक रविंद्र हरी मराठे (वय ५०, रा.रनाळे ता.नंदुरबार) यांना घेऊन जात होते. यावेळी रनाळे गावाजवळील बजरंग मंदिराजवळील टेकडीजवळ रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्याने डम्पर भरधाव वेगात चालवल्याने डम्पर उलटून अपघात घडला.
घडलेल्या अपघातात रविंद्र हरी मराठे हे ठार झाले तसेच वाहनाचे नुकसान झाले. अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरुन पसार झाला. याबाबत मनोज राजाराम मराठे यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात डम्पर चालक गणेश पटेल याच्याविरोधात भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, ४२७ सह मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४, १८७ प्रमाणे गुन्हा दाखल क रण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.देविदास नाईक करीत आहेत.








