Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार – वाका चार रस्त्यावर तिहेरी अपघात, तीन जण जखमी

team by team
February 6, 2023
in क्राईम
0
नंदुरबार – वाका चार रस्त्यावर तिहेरी अपघात, तीन जण जखमी
नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार – वाका चार रस्त्यावर  तीन ट्रकांमध्ये झालेल्या धडकेत तीन जण जखमी झाले असून या अपघातात तिन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. सदर अपघात घडला. या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाल्याने अपघातांमध्ये वाढ झाली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार – वाका चार रस्त्यावर (दि.४) शनिवारी सायंकाळी पावणेआठ वाजेच्या सुमारास सुकलाल झानसिंग बेडाले (रा.खरगोन, मध्यप्रदेश) हा त्याच्या ताब्यातील ट्रक घेवून जात असतांना त्याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगाने वाहन चालविले. यामुळे पेट्रोल पंपापासून काही अंतरावर निझरकडून नंदुरबारकडे येणारा ट्रक (क्र.एम.एच.१८ बीजी ८५०८) यास धडक दिली.
तोच आणखी एक ट्रक दोन्ही वाहनांजवळ धडकल्याने तिहेरी अपघात घडला. यात तीन जण जखमी झाले आहेत. यामध्ये नामदेव प्रल्हाद ठाकरे (वय ३८, रा. चितोड रोड, धुळे), सुकलाल झानसिंग बेडाले (रा.खरगोन, मध्यप्रदेश) व सितारामसिंग भटतारा (रा.खरगोन, मध्यप्रदेश) असे तिघा वाहनांवरील चालक जखमी झाले आहेत. सदर अपघात घडल्यानंतर रात्रीच्यावेळेला या रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे वाहनधारकांना एक ते दीड तास ताटकळत रहावे लागले.
उपनगर पोलिस निरीक्षक श्री.भदाणे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी नामदेव प्रल्हाद ठाकरे यांच्या फिर्यादीवरुन ट्रक चालक सुकलाल बेडाले याच्याविरोधात उपनगर पोलिस ठाण्यात भादंवि कलम २७९, ३३७, ४२७ सह मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.पितांबर जगदाळे करीत आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

चर्मकार समाज मंदिरासाठी १० लाख निधी देणार : आ. राजेश पाडवी

Next Post

रनाळे गावाजवळ डम्पर उलटल्याने सहचालक ठार

Next Post
पती-पत्नीस मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल

रनाळे गावाजवळ डम्पर उलटल्याने सहचालक ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add