नंदुरबार l प्रतिनिधी
गणपती विसर्जनासाठी प्रकाशा येथील घाटावर जाण्यास प्रतिबंध लावण्यात आलेला आहे. गणेश भक्तांनी श्री.गणेशचे विसर्जन करणे करिता प्रकाशा घाटावर जाऊ नये.असे आवाहन शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपक बुधवंत यांनी केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहादा पोलीस स्टेशन हद्दीतील असलेल्या प्रकाशा येथील घाटावर
दि. 14 सप्टेंबर रोजी 5 वा दिवस, दि. 16 सप्टेंबर
रोजी 7 वा दिवस, दि. 18 सप्टेंबर
रोजी 9 वा दिवस व दि. 19 सप्टेंबर रोजी 10 वा दिवसाच्या श्री.गणपती चे विसर्जन आहे.तरी तापी नदी पात्रात पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने मागील दिवसात सौ.मिनाबाई राजाराम बागुल रा.साक्री जि.धुळे व राज रविन समुद्रे रा.प्रकाशा असे पाण्याच्या जास्त प्रवाहात वाहून गेले आहे.त्यामुळे गणपती विसर्जन दिवशी प्रकाशा येथील घाटावर जाण्यास प्रतिबंध लावण्यात आलेला आहे. तरी कोणीही गणेश भक्तांनी श्री.गणेशचे विसर्जन करणे करिता प्रकाशा घाटावर जाऊ नये.काही अनुचित प्रकार घडल्यास सर्वस्वी जबाबदारी आपली राहील असे आवाहन शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपक बुधवंत यांनी केले आहे.