नंदूरबार l प्रतिनिधी
संपूर्ण मतदारसंघाला प्रेरणा मिळावी अशी कहाणी आहे.शहादा तालुक्यातील असलोद या गावातील 8 वर्षाच्या गणेश अनिल माळी ची त्याच्या शिक्षणाची जबाबदारी घेत गणेशला लागणाऱ्या सर्वच शासकीय सेवा मिळण्यासाठी आ.राजेश पाडवी यांनी कंबर कसली आहे.
जन्मताच गणेशला दोघे हात नाहीत; मात्र परिस्थितीवर मात करत अतिशय जिद्दीने गणेश आज सामान्य माणसाप्रमाणे आपले जीवन जगतोय, अगदी पायाने सर्वच काम करतोय.

सध्या इयत्ता दुसरीत शिक्षण घेणाऱ्या गणेश अनिल माळी यांची शहादा तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी साहेब यांनी गणेशची भेट घेतली. असून त्याचा संघर्षशील व जिद्दीचा जीवनप्रवास जाणून घेत..
त्यांची शिक्षणाची जबाबदारी घेत गणेशला लागणाऱ्या सर्वच शासकीय सेवा मिळण्यासाठी प्रयत्न करणार, तसेच कृत्रिम हाताची व्यवस्था कशी होईल यासाठी प्रयत्न करीत आहेत.