नंदूरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहिर येथे बनावट शाळेच्या दाखल्यावरुन जातीचा दाखला प्राप्त करुन ग्रामपंचायत उमेदवारीसाठी अर्ज दाखल करुन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी महिला सरपंचाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहिर येथील सरीता कांतीलाल पाडवी या महिलेने ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक २०२२ साठी बनावट शाळेच्या दाखल्यावरुन जातीचा दाखल प्राप्त करुन उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला. तसेच वाण्याविहिर ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंचा म्हणून निवडणूक आल्या.
त्यामुळे त्यांनी बनावट जातीचा दाखला सादर करुन व सरपंच म्हणून निवडून आल्याने शासनाची फसवणूक केली. याबाबत अक्कलकुवा नायब तहसीलदार दिलीप गांगुर्डे यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात सरीता कांतीलाल पाडवी यांच्याविरोधात १९३, १९९, २००, ४२०, ४६५, ४७१ सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रितेश राऊत करीत आहेत.