Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वायदे बाजारावरील बंदी उठविण्यास केंद्र शासनाची सकारात्मक भुमिका

आम आदमी शेतकरी संघटनेचे आंदोलन तुर्त स्थगित

team by team
February 3, 2023
in राजकीय
0
वायदा बाजाराची बंदी त्वरीत मागे घ्यावी, आम आदमी शेतकरी संघटनेतर्फे राज्यभर आंदोलनाचा ईशारा

नंदूरबार l प्रतिनिधी

 

 

 

आम आदमी शेतकरी संघटनेने शेत मालाच्या सेबी अंतर्गत होणार्‍या वायदे बाजारावरील बंदी उठविण्यासाठी सेबी व केंद्र सरकारला विनंती केली होती. त्या अनुषंगाने आम आदमी शेतकरी संघटना व इतर शेतकरी संघटना यांच्या दबावामुळे सेबीने व एमसीएक्स या संस्थांनी कपाशी पिकाचे वायदे बाजार पुन्हा सुरु करणे तसेच वायदे बाजारात पूर्वी फक्त धनदांडग्यांना शेतमालाचा वायदे बाजाराचा व्यवहार करता येत होता. परंतू आता एमसीएक्स व सेबीच्या नवीन धोरणानुसार लहान व्यापार्‍यांना सुद्धा शेती पिकांच्या वायदे बाजारात होणार्‍या सौद्यांमध्ये भाग घेण्यासाठी परवानगी दिली असल्याने कापसाच्या बाजाराला तेजी येण्यासाठी एक सकारात्मक पाऊल उचलेले दिसत आहे.

 

 

 

 

सेबी व एमसीएक्सने जाहीर केलेल्या पत्रकानुसार दि.१३ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रत्यक्ष कपाशीचे सौदे सुरु करण्याचे संकेत दिले आहेत. तसेच इतर शेतमालाच्या सौद्याच्या संदर्भातही सकारात्मक भुमिका घेण्याचे सांगितले आहे. त्यामुळे आम आदमी शेतकरी संघटना दि.६ फेब्रुवारी २०२३ शेतकर्‍यांच्या कपाशी पिकाच्या रखडलेल्या बाजार भावाविषयी व केंद्र सरकार व सेबीने वायदे बाजाराला जी बंदी आणली होती, ती बंदी उठविण्याबाबत रास्ता रोको आंदोलन करणार होते. परंतू सेबी व एमसीएक्सने जाहीर केलेल्या अधिसुचनेनुसार कपाशी या पिकाचे वायदे बाजार सुरु आहेत, असे आश्‍वास दिले आहे.

 

 

 

 

तसेच इतर पिकांच्याबाबतीत केंद्र सरकार व सेबीने सकारात्मक भुमिका घ्यावी, असे आवाहन  करीत आहोत. आम आदमी शेतकरी संघटना आपले आंदोलन तुर्त स्थगित करीत असून दि.१३ फेब्रुवारीपर्यंत सोयाबीन, तूर, हरभरे, भात व इतर पिकांबाबतीत वायदे बाजार सुरळीत सुरु झाला नाही, तसेच शेतमालाच्या बाजार भावात सुधारणा झाली नाही तर आम आदमी शेतकरी संघटना पुन्हा दि.१३ फेब्रुवारी २०२३ नंतर पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेईल.

बातमी शेअर करा
Previous Post

हरणखुरी येथे जि.प.शाळेतील बालकांची सिकलसेल तपासणी

Next Post

शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी महिला सरपंचाविरोधात गुन्हा दाखल

Next Post
कर्जापोटी तारण मालमत्तेची परस्पर विक्री करून बँकेची साडेतीन कोटीत फसवणुक, सहा जणांविरूध्द गुन्हा

शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी महिला सरपंचाविरोधात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026
नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

June 28, 2026
कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add