नंदूरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील हरणखुरी गावातील जिल्हा परिषद शाळा येथे विद्यार्थ्यांची व गावातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आले. या अनोख्या उपक्रमाची 100 पेक्षा अधिक नागरीकांनि उपक्रम घेतला. गावातील वय वर्ष ३० पेक्षा अधिक असलेल्या नागरिकांची रक्तदाब व मधुमेहाची चाचणी करण्यात आली. तर जि.प. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची सिकल सेल तपासणी करण्यात आली. तसेच तपासणीत आरोग्याच्या समस्या दिसून आलेल्या नागरिकांना समुपदेशन व औषधोउपचार करण्यात आले.
प्राथमिक आरोग्य केंद्र खुंटामोडीच्या वतीने वैद्यकीय अधिकारी डॉ.एम.पी.ठाकरे, डॉ.एन.एस.परमार, डी.मगावकर, परिचारिका तोरडे, डी.व्ही.परमार, डी.व्ही.वळवी यांनी जबाबदारी पहिली. आरोग्य तपासणी शिबिरासाठी सरपंच अर्जुन पावरा, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व हरणखुरी भुजगाव गावातील आशाताई अंगणवडीताईंनी विशेष परिश्रम घेतले.
“तालुक्यात सिकलसेलचे मोठे प्रमाण आहे. भूजगाव ग्रामपंचायत परिक्षेत्रात असलेल्या दोन्ही जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांची सिकलसेल आणि आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. आज हरणखुरी येथील शाळेतील बालकांची तपासणी करण्यात आली. सिकलसेल पिडीत मुलांची माहिती पालक आणि शिक्षक व्हावी जेणेकरून अश्या बालकांची वेळीच काळजी घेता येईल. तर तालुक्यात मागील काही दिवसात मधुमेह आणि रक्तदाबाचे अनेक रुग्णदिसून येत आहेत गावातील अश्या रुग्णांची आरोग्य तपासणी करून त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मदतीने योग्यते समुपदेशन करण्यात येईल”
अर्जुन पावरा – सरपंच ग्रामपंचायत भूजगाव.