नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील घोटाणे येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित विद्यमान लोकनियुक्त सरपंच सचिन मगन धनगर यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयातील ध्वजपूजन व ध्वजारोहण करून राष्ट्रगीताने व ध्वज गीताने मानवंदना देण्यात आली.
यावेळी राजमाता अहिल्यादेवी शिक्षण संस्था संचलित जनता माध्यमिक विद्यालयाचे ध्वज पूजन व ध्वजारोहण गावातील सामाजिक कार्यकर्ता दीपक राजाराम चौधरी यांच्या हस्ते व जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा घोटाणे ता.जि. नंदूरबार येथे ना. का. तांबोळी माध्यमिक विद्यालय रनाळे येथील शिक्षक अमोल मुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी छोटू बारकू धनगर यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा ग्रामपंचायतीस भेट देण्यात आली.
याप्रसंगी राजमाता अहिल्यादेवी होळकर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सर्वसंचालक मंडळ व उपसरपंच,विद्यमान सदस्य, माजी सरपंच, तलाठी, ग्रामसेविका चव्हाण, पोलीस पाटील महेंद्र बच्छाव, अंगणवाडी सेविका, जनता माध्यमिक विद्यालयाचे व जिल्हा परिषद मराठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व इतर संस्थेचे पदाधिकारी आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.