Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

गणेश जयंती निमित्ताने लोकनेते माणिकराव गावित परिवारातर्फे महाप्रसाद वाटप

team by team
January 29, 2023
in राजकीय
0
गणेश जयंती निमित्ताने लोकनेते माणिकराव गावित परिवारातर्फे महाप्रसाद वाटप
नवापूर l प्रतिनिधी
श्री गणेश जयंती निमित्ताने लोकनेते माणिकरावजी गावितपरिवाराच्या वतीने डोकारे (ता. नवापूर) येथील आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरत गावित, नंदुरबार जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती संगीता गावित, युवा उद्योजक धनंजय गावित व इंजि. मानस गावित यांच्या तर्फे शहरातील सर्व जाती धर्मातील नागरिकांसाठी महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम झाला. यावेळी हजारो नागरिकांनी लाभ घेतला.
श्री गणेश जयंती निमित्ताने सकाळ पासूनच सरदार चौकातील गणपती मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. प्रारंभी गणपती मंदिरात ११ पौरोहीत्यांच्या उपस्थितीत दुग्धाभिषेक करीत गणपती अथर्वशीर्षचे सहस्त्रावर्तन म्हणण्यात आले. तदनंतर डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरत गावित व नंदुरबार जिल्हा परिषद महिला बालकल्याण सभापती संगीता गावित यांच्या हस्ते सत्यनारायणाची विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी गणपती मंदिराचे अध्यक्ष प्रकाश पाटील व  विश्वस्त मंडळ उपस्थित होते.
महाप्रसाद : 
सायंकाळी साडेसहाला गणपती मंदिरा समोर सरदार चौकात व दिगंबर पाडवी क्रिकेट मैदानात शहरातील सर्व जाती धर्मातील नागरिकांसाठी स्नेहभोजन कार्यक्रम सुरु झाला. यात शहरातील बहुतांश नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.शहरातील गणेश मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे वाढपी सोबत भोजन वाढण्यासाठी सहकार्य केले. प्रत्येकाला भोजन मिळेल अशी व्यवस्था करण्यात आली होती.ज्येष्ठ व वयोवृद्ध नागरिकांसाठी स्वतंत्र टिफिन ( डबा ) देण्यासाठी सहा टेबल लावून स्वतंत्र व्यवस्था असल्याने बहुतेकांनी टिफीन घेऊन गेले.
यावेळी नगरसेवक गिरीश गावित, पुष्पा गावित, जयवंत जाधव,अजय गावीत,  यांच्यासह सुमाणिक प्राथमिक शाळा,स्वर्गीय सौ हेमलत वळवी अनुदानित प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा,पांघरण अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा कारेघाट, दादासाहेब माणिकरावजी गावित नागरी सहकारी पतसंस्था नवापूर, स्व.हेमालताताई वळवी सहकारी ग्राहक भांडार नवापूर, देवमोगरा गॅस एजन्सी, सुराई गो शाळा या संस्थेतील पदाधिकारी कर्मचारी व शहरातील विविध सामाजीक,धार्मिक संस्थेतील कार्यकर्ते यांनी महाप्रसाद वाटपाचे काम केले.
बातमी शेअर करा
Previous Post

घोटाणे येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Next Post

खाई जि. प.शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा

Next Post
खाई जि. प.शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा

खाई जि. प.शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add