नंदुरबार l प्रतिनिधी
काकेश्वर विद्या प्रसारक संस्था भालेर संचलित श्रीमती क.पु. पाटील माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय भालेर ता. जि. नंदुरबार येथे ७४ वा “प्रजासत्ताक दिन” उत्साहात साजरा करण्यात आला.


या प्रसंगी, सांस्कृतिक कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे भास्करराव हिरामण पाटील व आलेल्या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. तसेच मागासवर्गीय कन्या छात्रालयाचे ध्वजारोहण रमेश नामदेव भामरे (सेवानिवृत्त शिपाई) यांच्या हस्ते करण्यात आले. व विद्यालयाचे ध्वजारोहण शिवदास देवराम भिल (भालेर) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर भास्करराव पाटील, सचिव भिका भाना पाटील, माजी. सरपंच तथा संचालिका सौ. बेबीताई भास्करराव पाटील, प्राचार्य सौ.विद्या चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य तथा प्राध्यापिका कविता चंद्रशेखर पाटील, सरपंच तथा उपशिक्षिका शोभा प्रल्हाद बागुल, संचालक मंडळातील सर्व सदस्य भालेर,नगाव,तिशी, काकरदे, निंभेल, वडवदसह पंचक्रोशीतील सर्व पालक संस्थेचे हितचिंतक आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी विद्यालयातील विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागत गीता द्वारे उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही.व्ही. इसी यांनी केले . प्रास्ताविक प्राचार्य सौ. विद्या चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाचे फलक लेखन रेखाटन कलाशिक्षक व्ही. आर. ठाकरे यांनी केले. स्वागत गीताची तयारी सर्व महिला शिक्षिका यांनी करुन घेतली.साउंड सिस्टीम ची जबाबदारी निखिल पाटील यांनी पार पाडली. शाळा सुशोभीकरण व पटांगण आखणी सर्व बीपीएड शिक्षक, शिक्षिका सर्व कर्मचारी वृंद यांनी एकत्र मिळून केले. विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी महात्मा गांधी, भारत माता, झाशीची राणी सावित्रीबाई फुले ,अहिल्याबाई होळकर मासाहेब जिजाऊ, आदिवासी पेहराव अशा विविध वेशभूषा साकारून विद्यार्थी आले होते.

सर्व ग्रामस्थांचे लक्ष त्यांनी वेधले. विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्यात असलेले कलागुण सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे अतिशय चांगल्या पद्धतीने सादर केले. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घेतला. पंचक्रोशीतील सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांनी व संस्थेचे हितचिंतक यांनी विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमास दाद दिली व भरपूर बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला. व परिसरातून विद्यार्थ्यांना खाऊ स्वरूपात चॉकलेट बिस्कीट देण्यात आले कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांना चहापान देण्यात आले.
सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना चाॅकलेटचे वाटप करण्यात आले. छात्रलयातील सर्व विद्यार्थिनींना विद्यालयातील पर्यवेक्षक ए. व्ही. कुवर यांनी जिलेबी दिली. संपूर्ण कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेच्या सर्व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संचालक मंडळ, ग्रामस्थ यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आयोजन नियोजन मुख्याध्यापिका सौ.विद्या चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.