Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भुसावळ परिसरात 3.3 रिश्टर स्केल या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का

Mahesh Patil by Mahesh Patil
January 28, 2023
in राज्य
0
भुसावळ परिसरात 3.3 रिश्टर स्केल या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का

जळगाव   l

जिल्हयातील भुसावळ, सावदा परिसरात आज दि. 27/01/2023 रोजी सकाळी 10.35 वाजता 3.3 रिश्टर स्केल या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. याबाबत अधिकची माहिती घेण्याचे काम सुरु असून सदरच्या धक्क्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवीत वा वित्तहानी झाल्याची बाब अजूनपर्यंत निदर्शनास आलेली नाही. त्यामुळे नागरीकांनी घाबरून जाऊ नये तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.

याबाबत प्रशासन सतर्क असून नागरीकांना सर्वतोपरी मदत करणेस तयार आहे. असे अमन मित्तल, जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

भूकंपाविषयी कुठलीही माहिती द्यावयाची असल्यास अथवा मदत हवी असल्यास दुरध्वनी क्रमांक 0257- 2223180 व 0257- 2217193 या क्रमांकावर नागरीकांनी संपर्क करावा.

भूकंपा दरम्यान काय कराल ?

जर तुम्ही भूकंपाचा धक्का बसत असताना इमारतीच्या आत असाल तर ?

घरातील सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या. (उदा. टेबलाखाली, बीमखाली, तुळईखाली, दरवाजाच्या चौकटीखाली, कॉलमजवळ) लिफ्टचा वापर करू नका. दाराजवळ अथवा प्रवेशद्वाराजवळ गर्दी करू नका. स्वतः शांत रहा व इतरांना शांत राहण्यास सांगा. संबंधीत यंत्रणांना त्वरीत कळवा.

जर तुम्ही रस्त्यावर असाल तर ?

पटकन मोकळ्या जागेत जा, घाई-गडबड, दंगा करू नका. उंच, जुन्या आणि सलग असणान्या इमारतीपासून भिंती, विजेच्या तागंपासून लांब थांबा.

भूकंपादरम्यान काय करावे ?

जमिनीवर पडा, मजबूत टेबलाखाली आसरा घ्या. जमीन हालणे थांबेपर्यंत त्याला धरून ठेवा. जर जवळपास टेबल नसेल तर जमिनीवर झोपा, पाय पार्श्वभागावर घ्या, डोके गुडघ्याजवळ घ्या, डोक्याच्या बाजू कोपरांनी झाकून घ्या आणि हात माने भोवती घ्या. तुम्ही एखाद्या जागेच्या आतमध्ये धक्के बसणे बंद होईपर्यंत आतच राहा. भूकंपाचा धक्क्यावेळी बेडरूममध्ये असाल तर उशीच्या सहाय्याने डोके वाचवा.

भूकंपानंतर काय करावे ?

रेडिओ/टि.व्ही. वरून मिळणाऱ्या आपत्तीविषयक सूचनांचे पालन करा. अफवांवर विश्वास ठेवू नका व पसरवू नका. जुन्या इमारती, नुकसान झालेल्या इमारतीजवळ जाऊ नका व विजेच्या तारा, दगडी भिंतीपासून दूर रहा. पाणी, विज, गॅस कनेक्शन सुरू असल्यास बंद ठेवा. बांधकाम तज्ञांकडून इमारतीची तपासणी करून ती किती कमजोर झाली याची माहिती घ्या. जर काही व्यक्ती जमिनीत गाडल्या गेले असतील तर घटनास्थळी थांबा व त्यांना बाहेर काढण्यासाठी मदत करा. शोध व बचाव यंत्रणेस तात्काळ कळवा. असेही जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

पालकमंत्र्यांचे आवाहन

भुसावळ परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. काही अडचण असल्यास त्वरित प्रशासनाशी संपर्क साधावा. असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

नागपूर झिरो माईल जागा मच्छीमार भोई समाजास मिळावी, नंदुरबार जिल्हा भोई समाज सेवा मंडळाची मागणी

Next Post

भालेर येथील क.पु. पाटील विद्यालयात प्रजासत्ताक दिन, सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा

Next Post
भालेर येथील क.पु. पाटील विद्यालयात प्रजासत्ताक दिन, सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा

भालेर येथील क.पु. पाटील विद्यालयात प्रजासत्ताक दिन, सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहादा महाविद्यालयात अमृत महोत्सवानिमित्त आझाद हिंद ची गाथा नाट्याचे प्रस्तुतीकरण

शहादा महाविद्यालयात अमृत महोत्सवानिमित्त आझाद हिंद ची गाथा नाट्याचे प्रस्तुतीकरण

March 24, 2023
शहादा येथे आंतरराष्ट्रीय गुर्जर दिवस उत्साहात साजरा

शहादा येथे आंतरराष्ट्रीय गुर्जर दिवस उत्साहात साजरा

March 24, 2023
अंगणवाडी सेविका सक्षमीकरण प्रशिक्षण कार्यशाळा

अंगणवाडी सेविका सक्षमीकरण प्रशिक्षण कार्यशाळा

March 24, 2023
खादी ग्रामोद्योग मंडळाच्या पंतप्रधान रोजगार निर्मिती मेळाव्यास श्रावणीत उत्स्फूर्त प्रतिसाद

खादी ग्रामोद्योग मंडळाच्या पंतप्रधान रोजगार निर्मिती मेळाव्यास श्रावणीत उत्स्फूर्त प्रतिसाद

March 24, 2023
तळोदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे गुढीपाडवा सण उत्साहात साजरा

तळोदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे गुढीपाडवा सण उत्साहात साजरा

March 24, 2023
बाळदा येथे दोडे गुजर समाजाचा कौतुकास्पद निर्णय  रिंग सेरेमनी, प्रिवेडिंग शूटिंग, बेबी शॉवर इतर गोष्टींवर सर्वानुमते बंदी

बाळदा येथे दोडे गुजर समाजाचा कौतुकास्पद निर्णय रिंग सेरेमनी, प्रिवेडिंग शूटिंग, बेबी शॉवर इतर गोष्टींवर सर्वानुमते बंदी

March 24, 2023

एकूण वाचक

  • 2,958,065 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group