Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नागपूर झिरो माईल जागा मच्छीमार भोई समाजास मिळावी, नंदुरबार जिल्हा भोई समाज सेवा मंडळाची मागणी

team by team
January 28, 2023
in क्राईम
0
नागपूर झिरो माईल जागा मच्छीमार भोई समाजास मिळावी, नंदुरबार जिल्हा भोई समाज सेवा मंडळाची मागणी

नंदुरबार  l प्रतिनिधी

नागपूर येथील झिरो माईलची जागा मच्छीमार भोई समाजास मिळावी, अशी मागणी नंदुरबार जिल्हा भोई समाज सेवा मंडळातर्फे करण्यात आली आहे. तसे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना देण्यात आले.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, नागपूर शहरातील झिरो माईल परिसरात विदर्भ विभागीय मच्छीमार संघाने शासनाने जागेची ठरविलेली किंमत रु.२९,७१५/- रक्कमेने भूमी अभिलेख कार्यालयात दि.११ नोव्हेंबर १९७४ रोजी भरुन बांधकाम मंजुरीने इमारत बांधली होती. पण हेरीटेज वॉक आणि मेट्रोसाठी सदरची जागा आवश्यक आहे, या निमित्ताने तत्कालिन जिल्हाधिकारी मार्फत दि.२७ डिसेंबर २०१७ रोजी प्रशासनाने ताब्यात घेतली आणि जागेवरील इमारत जमीनदोस्त केली. विशेष म्हणजे दरम्यानच्या काळात मे.उच्च न्यायालयाने ८५५४ चौ.फुट जागा सोडून उर्वरित जमीन प्रशासनाने विकास कार्यासाठी घ्यावी, असा आदेश दिला असतांना देखील प्रशासनाने इमारत जमीनदोस्त केली. उल्लेखित जागा महानगरातील महत्त्वाच्या स्थळी आहे म्हणून या संदर्भात अनेकांची मागणी आहे.

तसेच सर्व अभ्यासाअंती उच्च न्यायालयाने हेरीटेज वॉक प्रकल्पच रद्द केला आहे. मात्र तिकडे इमारत या निर्णयापूर्वीच तोडली गेल्याने मच्छीमार भोई समाजावर अन्याय झाला आहे. म्हणून सदरची जागा पूर्ववत विदर्भ मच्छीमार भोई समाजास, त्या जागेवर ज्या संस्थेचा हक्क आणि अधिकार आहे, अशा संस्थेस देण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे, निवेदन देतेप्रसंगी नंदुरबार जिल्हा भोई समाज सेवा मंडळाचे प्रभारी अध्यक्ष चंद्रकांत खेडकर, उपाध्यक्ष इंजि.रामकृष्ण मोरे, सदस्य ऍड.प्रकाश भोई, डॉ.गणेश ढोले, राजेंद्र भोई, संजय साठे, जितेंद्र खेडकर, सुरेश वाडीले, प्रताप सोनवणे आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

व्हाईस ऑफ मीडिया’ चे लाखोंचे पुरस्कार, पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड ची घोषणा

Next Post

भुसावळ परिसरात 3.3 रिश्टर स्केल या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का

Next Post
भुसावळ परिसरात 3.3 रिश्टर स्केल या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का

भुसावळ परिसरात 3.3 रिश्टर स्केल या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026
नंदुरबारचा ‘रविवार बाजार’ आता उड्डाणपुलाखाली; व्यावसायिकांना मिळणार अधिकृत परवाने

नंदुरबारचा ‘रविवार बाजार’ आता उड्डाणपुलाखाली; व्यावसायिकांना मिळणार अधिकृत परवाने

April 2, 2026
नंदुरबार जिल्ह्यात एक खत परवाना  रद्द, ६ निलंबित

नंदुरबार जिल्ह्यात एक खत परवाना रद्द, ६ निलंबित

April 1, 2026
होळ तर्फे रनाळा येथे घरफोडी करून सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

होळ तर्फे रनाळा येथे घरफोडी करून सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

April 1, 2026
भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त नंदुरबारमध्ये भव्य रथयात्रा

भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त नंदुरबारमध्ये भव्य रथयात्रा

April 1, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add