Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त नंदुरबारमध्ये भव्य रथयात्रा

team by team
April 1, 2026
in राजकीय
0
भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त नंदुरबारमध्ये भव्य रथयात्रा

नंदुरबार l प्रतिनिधी-

भगवान महावीर यांच्या २६२५ व्या जन्मकल्याणक दिनानिमित्त श्री.जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघ, नंदुरबार यांच्या वतीने शहरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त अजितनाथ जैन मंदिर येथून भव्य रथयात्रा काढण्यात आली. ही रथयात्रा शहरातून मार्गक्रमण करत महावीर जिनालय येथे संपन्न झाली.

रथयात्रेत जैन समाजाचे अध्यक्ष, सचिव तसेच मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते. आमदार चंद्रकांत रघुवंशी, उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी, बांधकाम समिती सभापती देवेंद्र जैन, नगरसेवक राऊ मोरे, चारुदत्त कळवणकर, विलास रघुवंशी, मनीष बाफना आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

शोभायात्रा संपल्यानंतर प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. साध्वीजींनी भगवान महावीर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तळोदा रस्त्यावरील भगवान महावीर स्वामी मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

महावीर सेना यांच्या माध्यमातून तूप बाजार येथे अन्नदान कार्यक्रम पार पडला. यावेळी अध्यक्ष सतीश जैन, मदनलाल जैन, नरेंद्र जैन, आकाश जैन, विवेक जैन, कमलेश जैन यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, दिवसभर आराधना भवन येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात सत्संग, भगवान महावीरांची यशोगाथा, सामूहिक आयंबील तप, सामूहिक जप, संध्या भक्ती व आरती आदी कार्यक्रमांचा समावेश होता.

याच प्रसंगी तळोदा रस्त्यावरील जैन मंदिराशेजारी “भगवान महावीर मार्ग” या फलकाचे अनावरण आमदार चंद्रकांत रघुवंशी व साध्वीजी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी बांधकाम समिती सभापती, नगरसेवक, मदनलाल जैन, मनीष बाफना यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. संबंधित रस्त्याला पालिकेमार्फत यापूर्वीच नाव देण्यात आले होते; नव्याने तयार करण्यात आलेल्या फलकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

बातमी शेअर करा
Previous Post

नेदरलँड्समध्ये पोस्टडॉक्टोरल अभ्यासासाठी डॉ. ज्ञानेश्वर राऊत यांची निवड

Next Post

होळ तर्फे रनाळा येथे घरफोडी करून सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

Next Post
होळ तर्फे रनाळा येथे घरफोडी करून सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

होळ तर्फे रनाळा येथे घरफोडी करून सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add