Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबारचा ‘रविवार बाजार’ आता उड्डाणपुलाखाली; व्यावसायिकांना मिळणार अधिकृत परवाने

team by team
April 2, 2026
in राजकीय
0
नंदुरबारचा ‘रविवार बाजार’ आता उड्डाणपुलाखाली; व्यावसायिकांना मिळणार अधिकृत परवाने

नंदुरबारचा ‘रविवार बाजार’ आता उड्डाणपुलाखाली; व्यावसायिकांना मिळणार अधिकृत परवाने

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार शहरातील इंदिरा मंगल कार्यालय परिसरात दर रविवारी भरणारा बाजार आता रेल्वे रुळापलीकडील उड्डाणपुलाखाली स्थलांतरित करण्यात येणार आहे. यासोबतच, ‘दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियानांतर्गत राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार व्यावसायिकांना पालिकेमार्फत अधिकृत परवाने दिले जाणार असल्याची माहिती शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली.

रविवार बाजारामुळे होणारी वाहतूक कोंडी आणि स्थानिक व्यापारी संकुलातील दुकानदारांशी होणारे वाद मिटवण्यासाठी बुधवारी पालिकेत आ. रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक पार पडली. यावेळी माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे, मुख्याधिकारी राहुल वाघ, सहायक पोलीस निरीक्षक जगदीश गावित, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील यांसह पालिकेचे अधिकारी व व्यावसायिक उपस्थित होते.

बाजाराच्या नवीन ठिकाणी प्रत्येक व्यावसायिकाला जागा निश्चित करून दिली जाईल. त्यासाठी पांढरे पट्टे मारले जाणार असून, व्यावसायिकांना केवळ त्याच मर्यादेत आपले दुकान थाटावे लागेल. या जागेसाठी व्यावसायिकांना ठराविक शुल्क भरावे लागेल, ज्यामुळे पालिकेच्या उत्पन्नातही भर पडेल.या निर्णयामुळे रविवार बाजारातील कटलरी, कपडे, खेळणी आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांना मोठा दिलासा मिळाला असून, शहराच्या मुख्य भागातील वाहतूकही मोकळी होणार आहे.

रोजगाराचे संरक्षण आणि समस्यांचे निवारण

“रविवार बाजार हा अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. त्यांना रोजगार मिळावा आणि नागरिकांनाही त्रास होऊ नये, असा सुवर्णमध्य आम्ही साधला आहे. परवाने मिळाल्यामुळे व्यावसायिकांना आता कायदेशीर संरक्षण मिळेल,” असे आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी यावेळी स्पष्ट केले.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्ह्यात एक खत परवाना रद्द, ६ निलंबित

Next Post

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

Next Post
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add