नंदुरबार | प्रतिनिधी
महात्मा फुले फाउंडेशन व समस्त माळी समाज नंदुरबार यांच्या वतीने सर्व शाखिय वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन आज रोजी स्वामी विवेकानंद हायस्कूल लहान माळीवाडा या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. यावेळीे पाचशेच्या आसपास युवक व युवतींनी आपला परिचय या मेळाव्यात दिला.
महात्मा फुले फाउंडेशनच्या महिला आघाडीने सर्व प्रकारचे काउंटर्स सांभाळले होते योग किंवा युती यांनी प्रवेशद्वारानंतर प्रवेश केल्यावर प्रथम त्यांची नोंदणी केली जात होती.सुरुवातीस संत सावता महाराज महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले होत्या विशेष म्हणजे स्टेजवर कोणत्याही प्रकारचे अध्यक्ष किंवा कोणतेही पदाधिकारी नव्हते.सर्वप्रथम या महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.सूत्रसंचालन ज्योती देवरे यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीयुत मधुकर माळी यांनी केले.यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून स्पर्धा परीक्षांचा तयारी आणि त्यावर असणारे मार्गदर्शन यजुर्वेंद्र महाजन तसेच जळगावचे दर्जी फाउंडेशनचे श्री.दर्जी यांचे यांनी केले.
यावेळी मी महात्मा फुले बोलतोय तसेच मी सावित्री फुले बोलते असे एक पात्री प्रयोगाचे आयोजन करून तपासणी शिबिर,शेती विषयक मार्गदर्शन शिबिर तसेच व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी गीतांजली माळी, इंजिनीयर शांतीलाल महाजन, जगन्नाथ माळी,मोहन माळी यांनी मागदर्शन केले. सदर कार्यक्रमात भीमराव देवरे यांना फाउंडेशनतर्फे डि.के माळी यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर वधू आणि वर उमेदवारांच्या परिचय सुरू झाला एकावेळी पाच वर, वधू उमेदवारांनी आपला परिचय दिला.