Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा २ फेब्रुवारीपासून परीक्षांवर बहिष्कार

team by team
January 18, 2023
in राज्य
0
महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा २ फेब्रुवारीपासून परीक्षांवर बहिष्कार

नंदुरबार | प्रतिनिधी-

राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी आपल्या प्रमुख सहा मागण्यासाठी दि.२ फेब्रुवारीपासून सर्व बोर्ड व विद्यापीठाच्या परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार आंदोलन करणार असल्याची घोषणा विद्यापीठ व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीचे प्रमुख संघटक अजय देशमुख व प्रमुख सल्लागार डॉ. आर. बी. सिंह यांनी केली आहे. या आंदोलनात कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठीय व  महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी    यात सहभागी होणार आहेत, अशी माहिती कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष  जी.वाय.पाटील आणि सरचिटणीस डॉ.ऋषिकेश चित्तम, यांनी  पत्रकार परिषदेत दिली.

 

 

 

यावेळी महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष रमेश आप्पा पाटील जळगाव, उपाध्यक्ष भटू बडगुजर नंदुरबार, धुळे जिल्हाध्यक्ष शालिकराव तिरमले शिरपूर, रवींद्र बोरसे धुळे, जळगाव  जि.अध्यक्ष ए.के.पाटील, उपाध्यक्ष अजय शिंदे नूतन जळगाव, नंदुरबार जिल्हाध्यक्ष मनिष कलाल तळोदा, जे.पी.चौधरी खापर,  विजय सजन पाटील अमळनेर, कल्याण पाटील, बापू भावसार साक्री, सचिन पाटील मारवड, बी.टी.पाटील पारोळा, शशिकांत पाटील धुळे, के.बी.पाटील धुळे, संग्रामसिंह पाटील नंदुरबार, विजय सोंजे पाचोरा, प्रसाद पाटील पारोळा, मनोज चौधरी नवापूर, बी.बी.गिरासे दोंडाईचा, जितेंद्र चौहान शहादा, जितेंद्र परदेशी धरणगाव, छोटू जाधव, सुनील भामरे आदी उपस्थित होते.

 

 

कृती समितीने आंदोलनाचे टप्पे ठरविले असून कर्मचारी १६ फेब्रुवारी २०२३ रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप करतील. राज्य शासनाने याची दखल घेतली नाही तर २० फेब्रुवारी २०२३ पासून बेमुदत संपावर जाणार आहेत. कल्याण येथील के. एम. अग्रवाल महाविद्यालयात झालेल्या संयुक्त कृती समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

 

 

 

गेल्या पाच वर्षापासून विद्यापीठ व महाविद्यालयीन संघटनानी  स्वतंत्रपणे आंदोलने केली होती. परंतु आश्वासनाशिवाय विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या कोणत्याही मागण्या मान्य झाल्या नाहीत. त्यामुळे प्रथमच विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी एकत्र आले आहेत. त्यामुळे उच्च व तंत्र शिक्षण क्षेत्रातील परीक्षेची यंत्रणा कोलमडणार आहे.

 

 

मागण्या
सेवाअंतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा रद्द केलेले शासन निर्णय पुनर्जिवित करुन पूर्ववत लागू करावी.सातव्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार १०.२०.३० वर्षानंतरच्या लाभाची योजना विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्‍यांना लागू करावी.सातव्या वेतन आयोगापासून वंचित असलेल्या १४१० विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोगलागू करुन विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्‍यांना १ जानेवारी २०१६ ते प्रत्यक्ष सातवा वेतन लागू झाला त्या कालवधीतील वेतनाच्या फरकाची थकबाकी अदा करावी.विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्‍यांची रिक्त असलेली पदे भरण्यास मान्यता द्यावी.२००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचार्‍यांना जुनी पेंशन योजना लागू करावी. विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचार्‍यांना सहाव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी गृहित धरून त्या आधारे सातवा वेतन आयोगाची वेतनश्रेणी लागू करावी.

 

 

आंदोलनाचे टप्पे
२ फेब्रुवारी २०२३ पासून होऊ घातलेल्या विद्यापीठ व कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावरील सर्व परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार. १४ फेब्रुवारी रोजी दुपारी २ ते २.३० अवकाश काळात निदर्शने. १५ फेब्रुवारी रोजी काळ्या फिती लावून कार्यालयीन काम करणे. १६ फेब्रुवारी रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप. २० फेब्रुवारीपासून सर्व अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालये बेमुदत बंद.

बातमी शेअर करा
Previous Post

ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या नंदुरबार जिल्हा युवक आघाडी अध्यक्षपदी सतीष काटके यांची नियुक्ती

Next Post

किरकोळ वादातून सात जणांना मारहाण ; तिघांसह जमावाविरोधात गुन्हा

Next Post
वाहनाची दुचाकीला धडक, तरुण जखमी

किरकोळ वादातून सात जणांना मारहाण ; तिघांसह जमावाविरोधात गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026
धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 4, 2026
खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

June 4, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

पालकमंत्री हसन मुश्रीफ आज जिल्हा दौऱ्यावर; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट

June 4, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add